साधारणपणे आईस्क्रीम, थंड पेय, कोल्ड्रिंक्स यांसारख्या पदार्थ थंड करण्यासाठी जाते. मात्र याव्यतिरीक्तही बर्फाचे अजूनही अनेक उपयोग आहेत. जाणून घ्या बर्फाचे आरोग्यदायी फायदे –

मुरुमाच्या समस्येपासून सुटका
मुरुमाच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर बर्फाच्या तुकड्यानं चेहऱ्यावर हलक्या हातानं मसाज करावा. त्वचेवर बर्फ रगडू नये. यामुळे छिद्रांचा आकार कमी होण्यास मदत मिळते. महत्त्वाचे म्हणजे छिद्रांमध्ये जमा झालेली घाण बाहेर पडते.

पायात लचक भरल्यास
पायात लचक आल्यास कपड्यात बर्फ गुंडाळून त्या जागेवर ठेवावे. सूज आणि वेदना कमी होईल.

डार्क सर्कल्स आणि टॅनिंगची समस्या कमी होते
कित्येक तास कम्प्युटरसमोर बसून काम करत राहिल्यानं, अपुऱ्या झोप इत्यादी कारणांमुळे डार्क सर्कल तसंच डोळे सुजण्याची समस्या निर्माण होते.
रोज रात्री डोळ्यांच्या जवळपास आईस क्यूबने मसाज केल्यास डार्क सर्कल्स आणि टॅनिंगची समस्या दूर होईल.

त्वचा निरोगी बनते
झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍यावर मसाज केल्याने स्किन टाइट होईल आणि निरोगी राहील. रात्री झोपण्यापूर्वी बर्फाने चेहर्‍याचा मसाज केल्याने पिंपल्स दूर होतात.

सनबर्नच्या त्रासावर प्रभावी
उन्हाळ्यात सूर्याच्या हानिकारक किरणांमुळे सनबर्नचा प्रचंड प्रमाणात त्रास होतो. यामुळे आपली त्वचा काळी पडू लागते. सोबतच त्वचेवरील तेज कमी होऊ लागतं. चेहऱ्यावर मुरुम, छोटे पुरळ देखील येऊ लागतात. उन्हाळ्यात होणाऱ्या त्वचा संसर्गापासून सुटका मिळवण्यासाठी बर्फाचा वापर करावा. त्वचेवर बर्फ लावल्यास सनबर्नचा त्रास कमी होईल. जळजळ होणे, खाज सुटणे यासारख्या समस्याही कमी होतील. बर्फाचा नियमित वापर केल्यास सनबर्नचा त्रास काही दिवसांत कमी होण्यास मदत मिळेल.

रक्ताभिसरण सुधारते
बर्फाचे काही तुकडे घेऊन तुम्ही चेहऱ्याचा मसाज करू शकता. यामुळे रक्ताभिसरण चांगलं होतं. यामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येण्यास मदत होते.

टीप : त्वचेवर थेट बर्फाचा वापर करण्याची चूक कधीही करू नये. एखाद्या स्वच्छ कॉटनच्या कापडामध्ये बर्फ घ्यावे आणि त्यानंतरच चेहऱ्याचा मसाज करावा.