कृती

सर्वप्रथम योगा चटईवर सावध मुद्रेत सरळ उभे रहा. दोन्ही हात मांड्यांजवळ आणा. उजवा गुडघा हळूहळू वाकवून डाव्या मांडीवर ठेवा. या दरम्यान डावा पाय जमिनीवर घट्ट ठेवावा. डावा पाय सरळ ठेवा आणि श्वास घ्या.
– हळू हळू श्वास घेताना दोन्ही हात वर करा. दोन्ही हात वर घेऊन ‘नमस्कार’ करण्याची मुद्रा करा. पाठीचा कणा सरळ ठेवा. आतून दीर्घ श्वास घेत राहा.

– श्वास सोडताना शरीर सैल सोडा. हळूहळू हात खाली आणा.

– त्यानंतर आता उजवा पायही जमिनीवर ठेवा. तुम्ही मुद्रेच्या आधी जसे उभे होतात तसेच उभे रहा. आता हीच प्रक्रिया डाव्या पायानेही करा.

*फायदे
– ज्या लोकांना नव्याने योगा शिकायचा आहे त्यांच्यासाठी हा सर्वात सोपा आणि फायद्याचं आसन आहे.
– तसेच हे आसन केल्याने लक्ष केंद्रित करण्यास आणि संतुलन साधण्यास मदत होते.
– शिवाय हे आसन दररोज केलं तर तुम्ही एका पायावर शरीर संतुलित करण्यास शिकता.