चेहऱ्याचे सौंदर्य वाढवण्यासाठी आकर्षक भुवया महत्वाची भूमिका पार पडतात. योग्य पद्धतीने शेप दिलेल्या भुवया आकर्षक दिसतात. डोळ्यांच्या भुवया सेट करण्यासाठी वॅक्सिंग, शेव्हिंगसारखे पर्याय देखील उपलब्ध आहेत. परंतु यापैकी सर्वात लोकप्रिय पर्याय म्हणजे थ्रेडिंग आणि प्लकिंग. मात्र अनेक महिलांना भुवया काढताना खूप त्रास सहन करावा लागतो. डोळ्यांभोवतीचा भाग नाजूक असल्याने तेथे वेदना होणे निश्चित आहे. जर तुम्हाला थ्रेडिंग करताना होणारा त्रास कमी करायचा असेल तर तुम्ही या टिप्स फॉलो करू शकता.
थ्रेडींग करताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे त्वचा घट्ट ठेवणे. थ्रेडच्या सहाय्याने भुवया कोरताना त्वचा घट्ट ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही स्वतः व्यवस्थित त्वचा घट्ट पकडू शकत नसाल तर दुसऱ्याची मदत घ्या. कारण त्वचा जितकी घट्ट होईल तितका त्रास कमी होईल आणि केस सहजपणे निघून भुवयांना योग्य आकार देता येईल.
हाताने किंवा बर्फाच्या तुकड्याने भुवयांचे केस रगडा. यामुळे केसांची मुळे कमजोर होऊन ती सहजपणे तुटतील.
घरी थ्रेडींग करणार असाल तर अंघोळ केल्यानंतर लगेच करा. कारण अंघोळ केल्यानंतर हेयर फॉलिकल ओपन झालेले असतात.
आयब्रो थ्रेडींग केल्यानंतर भुवयांना एलोवेरा जेल लावा. त्यामुळे त्वचेला थंडावा मिळतो.
भुवयांचे केस जास्त वाढू देऊ नका. जितके केस अधिक वाढतील तितका त्रास अधिक होईल.