मेटाबॉलिझम व्यवस्थित असेल तर पचनाशी संबंधित समस्या उद्भवत नाहीत. मेटाबॉलिझमची प्रक्रिया मंदावल्यास शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते. बेसल मेटाबॉलिक रेट चांगला ठेवण्यासाठी योग्य ती काळजी घेतली पाहिजे. जाणून घ्या पचनसंस्था सुरळीत ठेवण्यासाठी कोणती काळजी घ्यावी –
जास्त काळ उपाशी राहू नये. जर योग्य वेळी नाश्ता आणि जेवण केले तर वजनही संतुलित राहण्यास मदत होते.
सकाळचा नाश्ता नियमित करणे शरीरासाठी अवश्य आहे. सकाळी नाष्टा न केल्यास मेटाबॉलिझम प्रक्रिया मंदावू शकते.
झोपण्याच्या दोन तास आधी जेवण करावे. १२०० पेक्षा कमी कॅलरी घेतल्यावर मेटाबॉलिझम कमी होतो. मेटाबॉलिझम चांगला ठेवण्यासाठी ताजी फळे आणि भाज्यांचे सेवन केले पाहिजे. यासाठी कार्बोहायड्रेट्स घ्यावी आणि मेदयुक्त पदार्थ कमी केले पाहिजेत.
दररोज व्यायाम करावा. भरपूर पाणी प्यावे. दुपारच्या आणि रात्रीच्या जेवणानंतर १० ते १५ मिनिटे चालावे.