तुम्हाला जर सुंदर आणि मुलायम त्वचा ठेवायची असेल तर तुम्ही हे घरगुती उपाय करून पाहा. नक्कीच तुम्हाला फरक जाणवेल.

त्वचा चमकदार बनवण्यासाठी उपाय
एक चमचा कोरफड जेल घ्या. त्यात एक चमचा दही, एक चमचा बेसन आणि एक चमचा मध मिसळा. हा फेसपॅक आठवड्यातून दिवस लावा. असे केल्याने त्वचा चमकदार होण्यास मदत होते.

चेहरा, मान, हातावरील काळपटपणा कमी करण्यासाठी उपाय
आपला शरीराच्या उघड्या त्वचेवर सूर्यप्रकाश पडतो. त्यामुळे काहींची त्वचा काळी पडते. दही त्वचेचा काळपटपणा कमी करण्यास मदत करते.

कोरड्या त्वचेच्या समस्येपासून सुटका मिळवण्यासाठी
i) एक चमचा दह्यात एक चमचा मध मिसळा. त्यानंतर हे मिश्रण त्वचेवर लावा. थोडा वेळ ही पेस्ट चेहऱ्यावर राहूद्या. मग नंतर पाण्याने स्वच्छ धुवा. यामुळे कोरड्या त्वचेची समस्या दूर होण्यास मदत होईल.
ii) एक चमचा कोरफडमध्ये गुलाब पाणी मिक्स करा. त्यानंतर ही पेस्ट पूर्ण चेहऱ्यावर लावा. ही पेस्ट दहा मिनिटे चेहऱ्यावर राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा.

चेहऱ्यावरील काळी वर्तुळं घालवण्यासाठी उपाय
चिमुटभर हळद दह्यात मिसळा. दोन्हींचे चांगले मिश्रण करून घट्ट पेस्ट बनवा. मग ही पेस्ट डोळ्यांजवळ लावा. नंतर काही वेळाने कोमट पाण्याने डोळे धुवा.

टॉमेटो खाण्याचे फायदे

केस सरळ करण्यासाठी घरगुती उपाय