उपवासात शरीरात पाण्याची कमतरता भासू नये. दररोज 6-8 ग्लास पाणी प्या.
सर्वात महत्त्वाचं म्हणजे उपवासाच्या काळात शरीरात उर्जा राहिली पाहिजे. त्यामुळे या काळात फळांचा समावेश करा. ज्यामध्ये पाण्याचे प्रमाण जास्त असेल.
रिकाम्या पोटी अॅसिडिटी वाढू शकते. त्यासाठी अंतर ठेवून फळं खा.
तुम्ही सुका मेवा खाऊ शकता. तुम्हाला माहिती आहे का यामुळे शरीराला उर्जा मिळते. तसेच अशक्तपणाही दूर राहतो.
न्याहारीसाठी, तुम्ही दुधासह फळे घेऊ शकता किंवा दुधात भिजवलेले बदाम खाऊ शकता.