साहित्य

३ वाटी तीळ, २ वाटी साधा गूळ, अर्धी वाटी चिक्कीचा गूळ, वेचली पूड, जायफळ पूड, तूप, पाव वाटी खोबरे, पाव वाटी शेंगदाणा कूट

कृती

एका कढईमध्ये तीळ टाकून ते व्यवस्थित भाजून घ्या.
नंतर हे तीळ एका ताटामध्ये काढून घ्या व कढईमध्ये साजूक तूप गरम करण्यासाठी ठेवा. त्यामध्ये गूळ वितळवून पाक तयार करून घ्या.
त्यामध्ये भाजलेले तीळ, खोबऱ्याचे किस, शेंगदाणे कूट, वेलची पूड, जायफळ पूड टाका.
हे सर्व मिश्रण एकजीव करून घ्या.
आता गॅस बंद करा व मिश्रणापासून तिळाच्या वड्या पाडून घ्या.