माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : उन्हाळा म्हटंल की उत्साह वाढवायला, शिन घालवायला लिंबू पाणी (lemon water) हा उत्तम उपाय.. रिफ्रेश करणारे आणि एनर्जी वाढवणारे लिंबू पाणी पिले की शरीरातील पाण्याची कमतरता दूर होण्यास मदत होते. अनेकांना उन्हाळ्यात रोज लिंबू पाणी प्यायला आवडते. पण अनेकदा त्याच प्रकारचे लिंबू पाणी पिऊन कंटाळाही येतो. त्यासाठी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत, लिंबू पाणी तयार करण्याचे विविध पद्धती…कोणते ते आपण पाहूयात. (methods of preparing lemon water)

लिंबू पाणी पिण्याचे फायदे
लिंबू पाणी आरोग्यासाठी फायदेशीर आहे. यामुळे पचनासंबंधित समस्या दूर होतात. लिंबामध्ये जीवनसत्व क भरपूर प्रमाणात आढळते. त्यामुळे हाडे मजबूत होतात. शिवाय लिंबू पाण्यामुळे रोगप्रतिकार शक्ती चांगली वाढते.

हे ही वाचा ः  शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर

पुदिना लिंबू सरबत
लिंबू पाणी तयार करताना त्यात पुदिन्याच्या वापर केल्यास तुम्हाला आणखी रिफ्रेश करणारे सरबत प्यायला मिळेल. कारण पुदिन्याच्या फ्लेवर अत्यंत रिफ्रेशिंग असतो. हे सरबत तयार करण्यासाठी थोडी पुदिन्याची पाने, गरजेनुसार साखर आणि लिंबाचा रस घ्या. याची एक पेस्ट बनवा. एका ग्लास पाण्यात पुदिन्याच्या पानांची पेस्ट एकत्र करा. त्यात लिंबाचा रस घाला आणि चमच्याने एकत्र करा. अशा प्रकारे तुमचे पुदिना लिंबू पाणी तयार होईल.

नारळ पाणी लिंबू सरबत
नारळ आणि लिंबापासून तयार केलेले सरबत प्यायला आणखी उत्कृष्ट लागते. हे सरबत तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये १ कप नारळ पाणी घ्या. त्यात गरजेनुसार पिठीसाखर घालून थोडा आल्याचा रस आणि लिंबाचा रस घालून मिसळा. अशा प्रकारे नारळपाणी लिंबू सरबत तयार होईल. हे सरबत तुम्ही फ्रिजमध्ये थंड करून पिल्यास अधिक स्वादिष्ट लागते.

हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध

मसाला लिंबू सरबत
मसाला लिंबू सरबत चविला अत्यंत स्वादिष्ट लागते. यातील मसाला तुम्हाला अधिक ताजेतवाणे करेल. हे सरबत तयार करण्यासाठी एका ग्लासमध्ये एक चमचा धणे पावडर, हाफ टीस्पून काळी मिरी पावडर, थोडा चाट मसाला, थोडी जिरे पावडर, हाफ टीस्पून काळे मीठ, गरजेनुसार पिठी साखर आणि लिंबाचा रस घ्या. आता त्यात १ कप सोडा पाणी घालून ते एकत्र करा. तुमचे मसाला लिंबू सरबत तयार. यात तुम्ही बर्फ घालूनही ते पिऊ शकतात.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)