रक्तातील सोडियम, कॅल्शियम आणि इतर घटक यांचे प्रमाण वाढते तेव्हा ते किडनीमध्ये जमा होतात आणि त्याचा गोळा बनतो. त्याला किडनी स्टोन म्हणतात. किडनी स्टोनचा त्रास असेल तर आहारात काही पदार्थ खाणे टाळा. हे पदार्थ त्रास अधिक वाढवू शकतात. जाणून घ्या किडनी स्टोनचा त्रास असणाऱ्यांनी आहारात कोणत्या गोष्टी वर्ज कराव्यात –

टोमॅटो सॉस
१ कप टोमॅटो सॉसमध्ये ९०० मिलिग्राम एवढे पोटॅशियम असते आणि यामुळे किडनी स्टोनचा त्रास वाढण्याची अधिक शक्यता असते.

पालक
पालकमध्ये जास्तीत जास्त पोटॅशियमचे तसेच ऑक्सिलेटचे प्रमाण असते आणि त्यामुळे किडनीचा त्रास असणाऱ्या लोकांना हे धोकादायक आहे.

संत्र्याचा रस
संत्री हा व्हिटॅमिन सी चा महत्वपूर्ण सोर्स आहे. मात्र किडनीच्या स्टोनची समस्या असणाऱ्यांनी संत्र्याचा रस अजिबातही घेऊ नये. कारण यात पोटॅशिअमचेही प्रमाण अधिक असते.

लोणचे
लोणच्यांमध्ये मीठ अधिक प्रमाणात असते त्यामुळे शरीरात सोडियमचे प्रमाण अधिक वाढू शकते. किडनीच्या स्टोनची समस्या असणाऱ्यांनी लोणचे खाणे टाळावेच.

ब्राउन राईस
ब्राउन राईसमध्ये पोटॅशियम आणि फॉस्फरसचे प्रमाण अधिक असते. त्यामुळे किडनी स्टोनची समस्या असणाऱ्यांनी ब्राउन राईसचे सेवन टाळावे.

कोल्ड्रिंक्स
किडनी स्टोनचा त्रास असेल तर कोल्ड्रिंक्सचे सेवन टाळा. कोल्ड्रिंक्समध्ये असलेले फॉस्फोरिक अ‍ॅसिड स्टोन तयार होण्याचा धोका वाढवते.

मिठाचे सेवन मर्यादित करा
किडनी स्टोनचा त्रास होत असेल तर मिठाचे सेवन मर्यादित करा. जंक फूड, कॅनमधील खाद्यपदार्थ आणि स्नॅक्समध्ये जास्त मीठ वापरले जाते. त्यामुळे हे पदार्थ खाणे टाळा.