वजन वाढणे ही आता अनेकांची समस्या होऊन बसली आहे. ते कमी करण्यासाठी जिममध्ये जाणे आणि अनेक डाएट फॉलो करणे असे अनेक पर्याय आपण उपयोगात आणतो. मात्र हे न करता तुम्ही तुमच्या आहारात विशिष्ट वजन कमी करणाऱ्या पेयांचा समावेश करू शकता. जसे की अॅप्पल सायडर व्हिनेगर आणि आल्याचा चहा. असे मानले जाते की ही पेय प्यायल्याने मधुमेह, हृदय विकार, कर्करोग अशा समस्यांचा धोका कमी होतो. या शिवाय रक्तातील साखर कमी करण्यासाठी, कोलेस्टेरॉलची पातळी सुधारण्यासाठीही या पेयांची मदत होते. काय आहेत या पेयांची गुणधर्म आपण पाहणार आहोत.
आल्याचा चहा :
आले संधिवात, मळमळ, सर्दी होणे अशा अनेक समस्यांवर गुणकारी ठरू शकते. एका अभ्यासात वजन कमी करण्यासाठी आले प्रभावी असल्याचे सिद्ध झाले. तर एका अभ्यासात असे आढळले की ज्या उंदरांना आल्याची पावडर दिली गेली त्यांच्या वजनात भरपूर घट झाली. तसेच आल्याचा चहा भूक कमी करण्यास आणि कॅलरी बर्न करण्यासही मदत करतो. याचे सेवन रोज सकाळी करावे.
अॅप्पल सायडर व्हिनेगर :
अॅप्पल सायडर व्हिनेगरमध्ये अॅसिटिक अॅसिड असते जे इन्सुलिनची पातळी कमी करते. रोज किंवा आठवड्यातून एकदा अॅप्पल सायडर व्हिनेगर एक किंवा दोन चमचे पाण्यात टाकून जेवणाआधी प्यावे. यामुळे पचन क्रिया सुधारते तसेच भूक कमी लागते. याशिवाय कॅलरी बर्न करून वजन कमी करण्यासही याचे सेवन फायदेशीर ठरते. एका अभ्यासात स्पष्ट झाले की अॅसिटिक अॅसिड वजन वाढ रोखण्यासोबतच पोट व लिवरमध्ये चरबी जमा होण्यापासून वाचवू शकते. यामुळे पोट रिकामे होण्याची गती मंदावते आणि तुमचे पोट जास्त काळ भरलेले जाणवते त्यामुळे अति प्रमाणात खाण्यापासून तुम्ही स्वतःला रोखू शकतात.