माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : वजन वाढणे ही अनेकांची समस्या आहे. धावपळीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि व्यायामाचा आभाव ही वजन वाढण्यामागील काही प्रमुख कारणे आहेत. परंतु अनेकांना याचे वेळोवेळी पालन करणे शक्य होत नाही. त्यामुळे काही घरगुती उपाय यावर नक्की फायदेशीर ठरू शकतात. त्यातील एक आहे जिरे आणि बडीशेपचे पाणी. (weight loss)
हे ही वाचा ः शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर
वाढलेले वजन कमी करण्यासाठी तुम्हीही प्रयत्न करत असाल तर तुम्ही हे ड्रिंक पिऊन वजन कमी करू शकता. वजन कमी करण्यासाठी जिरे आणि बडीशेपचे पाणी अत्यंत फायदेशीर मानले जाते. जिरे आणि बडीशेपचे पाणी तुमचे चयापचय सुधारण्याचे काम करते. त्यामुळे तुम्हाला वजन कमी करण्यास मदत होते. वजन कमी करण्यासाठी चयापचय सुधारणे खूप महत्वाचे असते. शरीरातील चयापचय उत्तम असेल तर कॅलरीज बर्न करण्यास मदत होते.
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
शरीर डिटॉक्स करते
रोज सकाळी रिकाम्या पोटी जिरे आणि बडीशेपचे पाणी प्यायल्यास शरीरातून टाकाऊ पदार्थ बाहेर पडतात. यामुळे तुमची पचनसंस्था आणि चयापच देखील सुधारते. जिरे आणि बडीशेपचे पाणी शरीर डिटॉक्स करण्यास मदत करते. हे पाणी प्यायल्याने शरीराला अन्नातून पोषक तत्वे शोषण्यास मदत होते. यामुळे शरीरात ऊर्जा टिकून राहते
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)