अनेकांना उच्च रक्तदाबाची ( high blood pressure) समस्या असते. मात्र आपल्या आहारात सोडियमचे (मीठ) प्रमाण कमी असल्यास उच्च रक्तदाबाची समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत मिळते. भरपूर पाणी पिल्यास शरीरातील सोडियम कमी होते. अमेरिकन हार्ट असोसिएशन दैनंदिन सोडियम सेवन करण्याची मर्यादा 1500 मिलीग्राम ठेवण्याचा सल्ला देते. परंतु तुम्हाला आश्चर्य होईल की एक चमचा मिठात जवळपास 2400 मिलीग्रम सोडियम असते. एवढे सोडियम रोज शरीराला हानिकारक ठरून रक्तदाबाच्या समस्या उद्भवतात. मात्र असे तीन पदार्थ आहेत जे शरीरातील सोडियमचे प्रमाण नियंत्रणात ठेवतील.
केळी :
केळ पोटॅशियमचे एक समृद्ध स्त्रोत आहे. त्यातील खनिजे रक्तदाबाच्या समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसभरात एक तरी केळ खाणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. याशिवाय केळाचा शेक, स्मुदी असे तयार करून तुम्ही केळी खाऊ शकतात.
तांदूळ, शेंगदाणे आणि बदाम :
तांदूळ, शेंगदाणे, काजू, बदाम आणि ओट्स मॅग्निशियमचे स्त्रोत आहेत. हे एक आश्चर्यकारक खनिज आहे जे स्वाभाविकपणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. कारण मॅग्निशयम रक्तप्रवाह खेळता ठेवण्यास मदत करतात. एका संशोधनानुसार 500 ते 1000 मिलीग्रॅमचे मॅग्निशियम सेवन रक्तदाब नियंत्रणात ठेवते.
दूध आणि डेअरी पदार्थ :
आहारात दूध आणि डेअरी पदार्थांचा समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. यातील कॅल्शियम रक्त वाहिना स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तसेच यातील खनिजे हृदयाला तंदुरुस्त ठेवतात. दूध, पनीर, ताक सारखे कॅल्शियम युक्त पदार्थ आपल्या आहारात असल्याने तुम्ही अधिक तंदुरुस्त होतात.