आजकाल जीवनचक्रात बदल झाल्याने पोषक आहार आणि आरोग्याची काळजी घेणे आपण टाळतो. त्यामुळे मधुमेह, उच्च रक्तदाब अशा समस्या निर्माण होतात. त्यात थायरॉईड सारखे आजारदेखील पाठ सोडत नाहीत. मात्र अन्य आजारांच्या तुलनेत या आजारात औषधांपेक्षा योग्य आहारावर लक्ष देणे जास्त फायदेशीर ठरते. त्यांसाठी आपण आपल्या आहारात ज्युसचा समावेश करून घेऊ शकतात.

थायरॉईड एक गंभीर अशी समस्या आहे, ज्यामुळे वजन वेगाने वाढू लागते किंवा वेगाने घटू लागते. त्यामुळे भूक जास्त लागते परंतु पोटाच्या समस्या पण वाढू लागतात. त्यामुळे आहारावर लक्ष देणे फायदेशीर ठरते. हा थायरॉईड आजार नियंत्रणात ठेवण्यासाठी आपण काय करू शकतो हे पाहणार आहोत.

गाजर, अननसचा ज्युस :
थायरॉईड नियंत्रणात ठेवण्यासाठी गाजर, अननसाचा ज्युस अधिक फायदेशीर ठरू शकतो. याशिवाय सफरचंदाचा ज्युस देखील फायदेशीर ठरू शकतो. या ज्युसचे नियमित सेवन केल्यास थायरॉईड नियंत्रणात राहतो. तसेच हे ज्युस शरीरातील लोहची समस्या कमी करून शरीरातील रक्ताचे प्रमाण वाढवतात.

दुधी भोपळ्याचा रस :
दुधी भोपळा थायरॉईडवर गुणकारी समजला जातो. अनुषीपोटी दुधी भोपळ्याचा रस पिल्याने थायरॉईड नियंत्रणात राहतो. तसेच हा ज्युस ऊर्जा वाढवण्याचेही काम करतो. त्यामुळे शरीरातील अशक्तपणा दूर होतो. पुदिन्याची पाने टाकून दुधी भोपळ्याचा ज्युस तयार केला जातो. त्यात थोडे काळे मीठ टाकून त्याचे सेवन करता येते.

टीप – गाजर, अननसाचा ज्यूस आणि दुधी भोपळ्याचा रस नेहमी ताजे असतानाच प्यावेत.

पिंपल्सची समस्या सतावतेयं? मग रात्री झोपताना ‘या’ उपायांचा अवलंब करा

चष्म्याचा नंबर कमी करण्यासाठी टिप्स