पचनासंबंधित काही समस्या असल्यास बदाम खाऊ नका. बदामात फायबर्स अधिक प्रमाण असल्याने या समस्या वाढतील. बदामामध्ये जास्त प्रमाणात फायबर्स असतात. सगळेच फायबर्स आपले शरीर पचवू शकत नाही.

बदामामध्ये चरबी आणि कॅलरीज भरपूर असतात. त्यामुळे स्थूलतेची समस्या असलेल्यांनी बदाम खाणे टाळावेत. .

मुतखडा किंवा किडनी स्टोनची समस्या असल्यास किंवा पित्ताशया संबंधित काही त्रास असल्यास बदामाचे सेवन करणे टाळा. कारण त्यात ऑक्सलेटचे प्रमाण अधिक असते. किडनी स्टोनचा त्रास हा मूत्राशयात कॅल्शियमचे खडे झाल्यामुळे होतो. बदाम शरीरास कॅल्शियम शोषून घेण्यास मज्जाव करतात.

उच्च रक्तदाबाचा त्रास असलेल्या व्यक्तींनी बदाम खाणे टाळावेत.

वजन कमी करायचंय मग आहारात करा ओट्सचा समावेश; जाणून घ्या इतर आश्चर्यकारक फायदे

चंदन आरोग्यसाठी उपयुक्त; चंदनाचे आरोग्यदायी फायदे