माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : भारतातील 4 पैकी 3 लोकांमध्ये व्हिटॅमिन टी ची कमतरता आढळत असल्याचे समोर आले आहे. 1 एमजी या ऑनलाईन फॉर्मची संस्थेने केलेल्या अभ्यासात ही बाब उघड झाली. देशातील 2.2 लाख लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. या अभ्यासात तरुणांमध्ये व्हिटॅमिन डीचे प्रमाण कमी दिसून आले. (vitamin D deficiency)

टाटा ग्रुपची ऑनलाइन फार्मसी 1mg लॅब्सच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की 4 पैकी 3 भारतीयांमध्ये सूर्यप्रकाशातील जीवनसत्व म्हणजेच व्हिटॅमिन डीची कमतरता आहे. देशातील 27 शहरांतील 2.2 लाख लोकांवर हा अभ्यास करण्यात आला. हे महिला आणि वृद्धांपेक्षा तरुण पुरुषांमध्ये जास्त दिसून आले. व्हिटॅमिन डी ची ही कमतरता कशी भरून काढावी हे आपण पाहूयात…

हे ही वाचा ः  शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर

व्हिटॅमिन डी च्या कमतरतेने जाणवतील या समस्या
– सतत चिडचिड होणे
– पाय दुखणे, वारंवार आजारी पडणे
– त्वचा पिवळसर दिसणे
– केसगळती वाढली आहे.
– स्नायू कमकुवत होणे
– नीट झोपता येणे
– हाडांमध्ये वेदना होणे

व्हिटॅमिन डीची कमतरता का जाणवते?
व्हिटॅमिन डीच्या कमतरतेमागील महत्त्वाचे कारण म्हणजे त्वचा सूर्यप्रकाशाच्या संपर्कात न येणे. त्यामुळे त्वचा व्हिटॅमिन डी बनवू शकत नाही. सकाळी सूर्योदयानंतर दोन ते तीन तासांचा सूर्यप्रकाश उत्तम असतो. आपल्याकडे ऊन अधिक असल्याने अनेक जण उन्हात जास्त बसता नाहीत.

हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध

या गोष्टी खाल्ल्याने व्हिटॅमिन डीची कमतरता होईल दूर
मासे, दूध, दही, चीज, गाजर, सॉल्मन, टूना फिश, मशरूम, अंड्याचा पिवळा भाग, संत्री हे पदार्थ खाऊन आपण व्हिटॅमिन डीची कमतरता दूर करू शकतो.

उन्हात बसताना ही काळजी घ्या
– सकाळी 8 च्या सुमारास उन्हात बसणे चांगले
– किमान 30 ते 45 मिनिटे उन्हात बसावे
– उन्हात बसताना त्वचेचा जास्तीत जास्त भाग उघडा असावा
– सूर्याकडे पाठ करून बसावे.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)