माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : हिरव्या पालेभाज्या खाणे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. इतर भाज्यांप्रमाणे लसूणमध्येही अनेक पोषक तत्व आहेत. मात्र, शरीराला फायदे पोहोचवण्याबरोबरच त्याचे काही तोटेही आहेत. (side effects of eating garlic)

रक्तस्त्राव विकार
लसणात असे घटक असतात जे रक्त पातळ करू शकतात. त्यामुळे त्रास अधिक वाढू शकतो. रक्तस्त्रावाचा विकार आणि रक्त पातळ करणाऱ्या गोळ्या घेणाऱ्या लोकांसाठी लसूण धोकादायक आहे.

हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे

अ‍ॅलर्जी
काही लोकांना लसूण खाण्याची अ‍ॅलर्जी होत असते. ज्यामुळे अंगावर पित्त येणे, श्वासनाचा त्रास उद्भवणे असे प्रकार घडतात. लसूण खाल्यानंतर असा काही त्रास होत असेल तर अशा व्यक्तींनी डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

औषधांसोबत खाऊ नये
एचआयव्ही, कर्करोग आणि हृदयरोगाशी संबंधित औषधे अशा औषधांसोबत लसूण खाऊ नये. शिवाय रक्त पातळ करण्यासाठी औषध घेत असल्यास लसूण खाऊ नये.

हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी

पचनाशी संबंधित समस्या
लसणाचे जास्त सेवन केल्याने बद्धकोष्ठता, सूज येणे, गॅस, अतिसारचा त्रास होत असतो. लसणात फ्रक्टन आढळतो, जो एक प्रकारचा कार्बोहायड्रेट आहे. सेवन केल्याने पचनाशी संबंधित काही समस्या उद्भवू शकतात. काही लोकांना ते पचणे कठीण होते.

त्वचेची समस्या
काही लोक लसणाचा उपयोग त्वचेसाठी करतात. परंतु, असे केल्याने त्वचेवर लालसरपणाची समस्या उद्भवू शकते. कारण लसणात सल्फर संयुगे असतात.

(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)