उन्हाच्या झळा मागील काही दिवसांपासून वाढत चालल्या आहेत. त्यामुळे शरीरातील पाणी कमी होत असते. अशा दिवसात शरीरातील पाण्याची पातळी संतुलित राखण्यासाठी थंड पदार्थ किंवा फळे अत्यंत उपयुक्त ठरतात. आता बाजारात पपई मिळण्यास सुरुवात झाली आहे. मात्र पपईचा प्रभाव गरम असतो, त्यामुळे ती उन्हाळ्यात खावी की नाही असा प्रश्न अनेकांना पडतो. परंतु पपईचे या दिवसात मर्यादित सेवन फायदेशीरच ठरते..ते कसे आपण जाणून घेऊयात…(benefits of eating papaya in summer)
उन्हाळ्यात पपईचे सेवन करता येते, मात्र ते मर्यादित स्वरुपात असावे. पपईमध्ये व्हिटॅमिन ए, सी असे शरीराला पोषक घटक असतात. उन्हाळ्यात मधुमेह असलेल्या व्यक्तींच्या रक्तातील साखरेची पातळी अनेकदा वाढते. या दरम्यान पपई खाल्याने या व्यक्तींना थोडा आराम मिळतो. याशिवाय रक्तदाबही नियंत्रणात राहण्यास मदत होते.
डोळ्यांसाठी अत्यंत फायदेशीर आहे पपई
– दिवसभर डोळ्यांवर ताण येत असतो. डोळे शरीराचा अत्यंत नाजूक अवयव आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करणे धोकादायक ठरू शकते. शिवाय उन्हाळ्यात अनेकांचे डोळे जळजळ करतात. यावर उपाय म्हणून पपईचे सेवन फायदेशीर ठरते. पपईमध्ये व्हिटॅमिन ए भरपूर असल्याने दृष्टी सुधारण्यास मदत होते. त्यामुळे असे लोक नियमित मात्र मर्यादित प्रमाणात पपई खाऊ शकतात.
मासिक पाळीवर उपाय
अनेक महिलांना मासिक पाळीच्या अनियमिततेमुळे त्रस्त होतो. मासिक पाळी येण्यास उशीर झाल्यास त्रास होत असल्यास पपई खाल्यास फायदा होतो. शिवाय नियमितपणे मर्यादित प्रमाणात पपईचे सेवन केल्यास मासिक पाळीतील अनियमिततेची समस्या दूर होण्यास मदत होते.
वजन कमी करण्यास मदत
वजन कमी करण्यासाठीही पपईचा फायदा होतो. पपईमध्ये मोठ्या प्रमाणात फायबर असते. शिवाय पपईमुळे पोट दीर्घकाळ भरल्याचे जाणवते. पपई सकाळी उठल्यावर पपई खाल्यास दिवसभर भूक लागणार नाही. त्यामुळे आपले इतर पदार्थ खाण्यावर नियंत्रण राहिलं.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)