माझं आरोग्य (Maz Arogya) : तुम्हाला माहितीये का तुमचे घोरणे (Problem Of Snoring) काही वेळा गंभीर शारीरिक समस्येचे लक्षण असू शकते. श्वासोच्छ्वासाच्या वेळी घशातील सैल ऊतींमधून हवा जाते तेव्हा घोरण्याचा आवाज येतो. झोपेबाबतच्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या मते, व्यक्तीला झोपेसंबंधित आजार नसेल तर हे घोरणे चार पद्धतींचा वापर करून बऱ्यापैकी कमी करता येते. (4 Methods Can Reduce The Problem Of Snoring)
माउथ गार्ड (mouth gard)
याचा उपयोग घशातील हवेचा प्रवाह सुधारण्यासाठी होतो. माउथ गार्ड खालच्या जबड्याला थोडे पुढे नेते, यामुळे हवा वाहून जाणे सोपे होते.
नोज ब्रीदिंग स्ट्रिप्स
नोज ब्रीदिंग स्ट्रिप ही नाकावर चिटकवली जाणारी पट्टी असते, जी नाकातून आत घेतल्या जाणाऱ्या हवेचा प्रवाह सुधारण्यास मदत करते. झोपेत असताना नाकातून मोठा हवेचा प्रवाह जात असतो. श्वासोच्छ्वासात काही अडथळा आल्यास हा प्रवाह बिघतो, त्यामुळे घशातून घोरण्याचा मोठा आवाज येतो.
धक्कादायक! अपुऱ्या झोपेमुळे येते तारुण्यात म्हातारपण, अशी घ्या काळजी
व्यसन टाळा
धुम्रपानामुळे घशा जवळील ऊती कडक होतात. तर अल्कोहोलमुळे घशाच्या जवळच्या ऊती अधिक शिथिल होतात, यामुळे झोपल्यानंतर घोरण्याचे प्रमाण वाढते.
कुशीवर झोपणे
एका कुशीवर झोपल्याने गुरुत्वाकर्षणामुळे श्वासोच्छ्वासाला आधार देणाऱ्या घशातील ऊती खाली खेचल्या जातात, यामुळे श्वासोच्छ्वासात अडथळा येतो. शिवाय, झोपेत नाकातून जाणाऱ्या हवेचा प्रवाह सामान्य राहतो.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही)