अनेकदा आपण तूप खाण्यापासून नाक मुरडतो. काहींना वाटते की तूप खाल्याने वजन वाढेल. परंतु असे केल्याने आपल्या शरीराला पोषक तत्वांचा लाभ होत नाही. कोणतेही पदार्थ योग्य प्रमाणात खाल्यास त्याचे नुकसानकारक परिणाम जाणवत नाही. तूप जर सकाळी रिकाम्या पोटी खाल्ले तर त्याचे शरीराला अनेक फायदे जाणवतात. आहार तज्ज्ञांनी याचे काय फायदे सांगितले आहेत ते पण पाहुयात.

तूप खाण्याचे फायदे :

  1. आपल्या गॅस्ट्रोइंटेस्टाइनल ट्रेकमधील अ‍ॅसिडीक पीएचला कमी करते. त्यामुळे तुपाचे सेवन पोटासाठी फायदेशीर ठरते.
  2. रिकाम्यापोटी एक चमचा तूप खाल्ल्याने खाण्यापिण्याच्या खराब पद्धतीत सुधारणा होते. झोप न येणे, अपायकारक सवयी, दिवसभर बसून राहण्याची सवय यामुळे पोटाच्या समस्या सुरू होत असतात. त्याचा नैसर्गिक उपचार म्हणजे सकाळी उठल्यावर रिकाम्या पोटी तूप खाणे. तूप खाल्याने पचनशक्ती सुधारते.
  3. जर तुम्हाला तजेलदार, नितळ त्वचा हवी असेल तर तुम्ही रिकाम्या पोटी तुपाचे सेवन करू शकतात. यामुळे त्वचेला ग्लो येईल.
  4. अनेकांना पोट कडक झाल्यासारखे वाटते. अशा व्यक्तींनी सकाळी अनुषीपोटी तूप खाल्यास पोट मऊ होऊन साफ होते.
  5. तूप खाल्याने हाडे मजबूत होतात आणि स्टॅमिनाही वाढतो. तसेच आरोग्यात सुधारणा होते.