कांदा पदार्थाची चव वाढवण्यासाठी उत्तम घटक आहे. मात्र हाच याच कांद्यातील असे काही आश्चर्य गुणकारी घटक आहे जे तुम्हाला अनेक गंभीर आजारापासून दूर ठेवतील. कांद्यामध्ये कॅल्शियम, लोह, फॉलिक ऍसिड, अँटीऑक्सिडेंट आणि अन्य काही व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असतात, ज्यामुळे कांदा अनेक आजारांवर औषधी समजला जातो. चला तर जाऊन घेऊयात कांद्याचे आश्चर्यकारक गुण.

कॅन्सर ठेवा दूर :
एनसीबीआयच्या एक अहवालानुसार कांद्यामध्ये कॅन्सरचा धोका कमी करण्याचा गुण असतो. असोफेंगल कॅन्सर, कॉलॉरेक्टल कॅन्सर, पोटाचा कॅन्सर अशा कॅन्सरपासून दूर ठेवण्यास कांदा फायदेशीर आहे.

हृदय ठेवा मजबूत :
एक अहवालानुसार कांद्यात असणारा क्वार्सेटिन हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक करण्यापासून आणि रक्ताच्या गाठी होण्यापासून रोखते. क्वार्सेटिन चहा, सफरचंद आणि रेड वाईनमध्येही मोठ्या प्रमाणात असते.

मधुमेहावर फायदेशीर :
मधुमेह असलेल्या व्यक्तींची शरीरातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवण्यास कांदा मदत करतो. तसेच कांद्यामुळे रक्तातील साखर रोखण्यास मदत होते.

हाडे ठेवा मजबूत :
कांदा हाडांना मजबूत करण्यास मदत करतो. ऑक्सिडेटिव स्ट्रेस कमी करणे, एंटीऑक्सिडेंट पातळी वाढवणे आणि हाडांचे नुकसान कमी करण्यास कांद्याचा फायदा होतो. ऑस्टियोपोरोसिस रोखण्यास कांदा गुणकारी आहे. हाड टणक करण्यास कांदा साहाय्य करतो.

कोलेस्ट्रॉल कमी करण्यास मदत :
रक्तातील कोलेस्टेरॉल कमी कारणासाठी ही कांद्याचे सेवन केल्यास बराच चांगला फरक जाणवतो .