माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : भेसळयुक्त चहा पावडर विकण्याचे प्रमाण दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे अनेकजण रोज सकाळी अमृततुल्य विष म्हणून पितात. चहा पावडरमधील भेसळ उघड्या डोळ्यांनी ओळखता येत नाही. मात्र, अशा चहा पावडरपासून तयार केलेला चहा आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो. मात्र, अशी भेसळयुक्त चहा पावडर ओळखण्याचे घरगुती आणि सोपे उपायही आहेत..काय आहेत हे उपाय जाणून घेऊयात…(tea powder)
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
ग्लासभर पाणी
चहा पावडरमधील भेसळ ओळखण्याचे सर्वात सोपी पद्धत म्हणजे एका ग्लास पाण्यात एक चमचा चहाची पावडर टाकावी लागेल. जर चहा पावडर खरी असेल तर ग्लासमधील पाण्याच्या रंगात काहीच बदल होणार नाही. चहा पावडरमध्ये जर रंग टाकला असेल तर पाण्याचा रंग लाल होतो.
चुंबकाचा वापर
चुंबकाच्या माध्यमातूनही तुम्ही असली आणि नकली चहा पावडर ओळखू शकतो. काचेच्या डिशमध्ये चहा पावडर घेऊन त्याच्यावरून हळूवार चुंबक फिरवा. चहा पावडर खरी असेल तर ती चुंबकला चिटकणार नाही, पण जर ती भेसळयुक्त असेल तर नक्की चिटकेल.
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
लिंबूही आहे पर्याय
लिंबुच्या मदतीनेही असली आणि बनवटी चहा पावडरमधील फरक ओळखता येतो. काचेच्या भांड्यात लिंबाचा रस घेऊन त्यात थोडी चहा पावडर टाका. जर चहाची पावडर खरी असेल तर लिंबाचा रस पिवळा किंवा हिरवा होईल. दुसरीकडे, जर लिंबाचा रस केशरी किंवा अन्य रंगाचा झाला तर समजा की चहा पावडरमध्ये भेसळ झाली आहे.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)