कंकोळ हा मसाल्यातील पदार्थ अनेकांना कदाचित माहीतच नसेल. कंकोळाची फळे मसाला बनवण्यासाठी वापरतात. उष्ण असतात. कंकोळाची फळे उष्ण, चवीला तिखट आणि पचायला हलकी असतात. कफ आणि वातनाशक असणाऱ्या कंकोळाचे इतर फायदे जाणून घ्या –
अनेक आजारांवर गुणकारी
भूक न लागणे, तोंडाला चव नसणे, अपचन, पोटफुगी अशा विकारांवर कंकोळ गुणकारी आहे.
सूज कमी करते
शरीरावर वेदनायुक्त सूज असेल तर त्यावर कंकोळाचे चूर्ण पाण्यात मिसळून लेप करून वापरतात.
कंकोळ दंतमंजनमध्ये वापरतात
घसादुखत असेल तर कंकोळ तोंडात धरून चघळावा.
मौखिक आरोग्यासाठी उपयुक्त
कंकोळ तोंडात ठेवल्याने मुखदुर्गंधी, श्वासांची दुर्गंधी दूर होते.
सर्दी, कफवर गुणकारी
सर्दी, कफ झाला असलं तर कंकोळाचे चूर्ण नाकाने हुंगावे. कफ बाहेर पडून आराम वाटतो.
इतर उपयोग
कंकोळाची फळे विड्याच्या पानात घालतात.
शांत झोप हवी आहे मग प्या हळदीचे दूध; जाणून घ्या इतर महत्वाचे फायदे
अधिक गोड खाण्याची सवय शरीरासाठी हानिकारकच, जाणून घ्या शुगर अॅडिक्शनपासून मुक्ती कशी मिळवावी