चेहऱ्याला सर्वात सुंदर आकार देणारा अवयव म्हणजे नाक. त्यामुळे नाकाला शेप कसा द्यायचा यासाठी काही व्यायाम नक्की करून पाहा.

नोज शेपिंग
योगा मॅट घ्या. त्यावर शांत बसा. नंतर मोठा श्वास घ्या आणि सोडा. आता पुन्हा एकदा श्वास घ्या आणि आपल्या अंगठ्याने नाकाच्या बाजूला हलक्याने दाबा. नंतर ताकदीने श्वास सोडण्याचा प्रयत्न करा. लक्षात ठेवा की श्वास जोरात सोडायचा नाही. हा व्यायाम कमीत कमी दहा वेळा करा.

नाक लहान करणे
सर्वात पहिले खाली बसा. त्यानंतर अंगठ्याच्या शेजारील बोटाने नाकावर दाब द्या. नंतर त्या बोटाने नाक खाली वर करा. हा व्यायाम तुम्ही कितीही वेळा करू शकता.

नाक सरळ करण्यासाठी
आधी चेहऱ्यावर स्माईल द्या नंतर हाताच्या बोटांनी नाकाला वरच्या बाजूला न्या. हा प्रकार तुम्ही दिवसातून 20-30 वेळा करू शकता.

श्वासोच्छवासाचे व्यायाम
उजव्या हाताच्या अंगठ्याने एक नाकपुडी बंद करा आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास घ्या. त्यानंतर मधल्या बोटाने दुसरी नाकपुडी बंद करून पहिल्या नाकपुडीने श्वास सोडा. पुन्हा पहिल्या नाकपुडीने श्वास घ्या आणि दुसऱ्या नाकपुडीने श्वास सोडा. हा व्यायाम तुम्ही दिवसातून 10-12 वेळा करू शकता.

नाकाची मसाज
नारळाचे तेल घ्या. त्यानंतर त्याने नाकाची मसाज करा. आधी नाकाच्या वरचा भागाची मसाज करा. नंतर नाकाच्या खालच्या भागाची मसाज करा.

टीप
जर तुम्हाला सर्दी झाली असेल किंवा तुमच्या नाकाची सर्जरी झाली असेल तर हे व्यायाम करू नका.

केसांचा चिकटपणा घालवण्यासाठी घरगुती उपाय

डोकेदुखीची कारणे व त्यावरील घरगुती उपाय