देशभरात अनेक लसीकरण केंद्रे लस पुरावठ्या अभावी बंद करण्यात आली आहेत. अशातच भारत बायोटेक द्वारे बनविण्यात येणारी आणि नाकाद्वारे देण्यात येणारी कोरोनाची लस ‘गेमचेंजर’ ठरणार अशी शक्यता वर्तवली जात आहे.नाकाद्वारे व्हायरसचा प्रादुर्भाव होण्याचा अधिक धोका असतो. यामुळे ही लस प्रभावी होण्याची अधिक शक्यता आहे.

टोचून देण्यात येणारी लस फुफ्फुसाच्या फक्त खालील भागाचे रक्षण करू शकते परंतु नाकावाटे देण्यात येणारी लस ही नाकाचे आणि फुफ्फुसाच्या वरील भागाचे संरक्षण करण्यास सक्षम असल्याची माहिती भारत बायोटेक चे व्यस्थापकीय संचालक कृष्णा एल्ला यांनी दिली. ही लस यशस्वी ठरल्यास त्याचा मोठा फायदा भारतातील संसर्ग रोखण्यास होऊ शकेल असे नीती आयोगाच्या आरोग्य विभागाचे सदस्य व्ही. के. पॉल यांनी सांगितले आहे.