आयुर्वेदानुसार आवळा, हिरडा आणि बेहडा या तीन वेगवेगळ्या वनस्पतींनी तयार करण्यात आलेलं त्रिफळा चूर्ण अनेक आजारांवर रामबाण उपाय आहे. त्रिफळामध्ये अँटी-बॅक्टेरियल, अँटी-व्हायरल आणि अँटी-पायरेटिक गुणधर्म असतात. जाणून घ्या त्रिफळा चूर्णचे आरोग्यवर्धक फायदे –
पचनसंस्था सुधारते, वजन कमी होते
त्रिफळा पचनसंस्थेचा वेग वाढवते. शरीरातील अतिरिक्त चरबी कमी करते. तसेच आतड्यांना मजबूत करून साफ ठेवण्यासाठीही मदत करते. त्यामुळे त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने पचनसंस्थेचे कार्य सुधारते तसेच वजन कमी होते.
डोळ्यांच्या आरोग्यासाठी गुणकारी
त्रिफळा डोळ्यांसाठी टॉनिक म्हणून काम करते आणि डोळ्याच्या लेन्समध्ये ग्लूटाथिओन नावाचे अँटीऑक्सिडंट वाढवते. लालसरपणा आणि मोतीबिंदूची समस्या त्रिफळा चूर्णचे सेवन केल्याने कमी होते.
मधुमेह रुग्णांसाठी गुणकारी
फळा चूर्ण रक्तातील ग्लुकोजची पातळी कमी करण्यास मदत करते. त्रिफळा चूर्णामध्ये मधुमेहविरोधी आणि हायपोग्लायसेमिक गुणधर्म आढळतात.
दातांच्या आरोग्यासाठी गुणकारी
त्रिफळामध्ये अँटी- इंफ्लेमेट्री आणि अँटी- बॅक्टेरियल गुणधर्म आढळतात. त्रिफळा खाल्ल्याने दातांच्या काही समस्यांपासून सुटका मिळते. तसेच दात मजबूत बनतात.
अशक्तपणा कमी होतो
त्रिफळा चूर्णाचे सेवन केल्याने अशक्तपणा कमी होतो.
बद्धकोष्ठतेवर गुणकारी
कोमट पाण्यात त्रिफळा चूर्ण घालून नियमितपणे घेतल्याने बद्धकोष्ठतेचा त्रास कमी होतो.