दूध, दही, तूप, मध आणि साखर एकत्र करून पंचामृत बनविले जाते. पंचामृत पूजेच्या वेळी प्रसाद म्हणून दिले जाते शक्यतो इतर वेळी आपण पंचामृतचे सेवन करत नाही. मात्र पंचामृताचे नियमित सेवन केले तर, शरीराला अनेक लाभ होऊ शकतात. जाणून घ्या पंचामृतचे सेवन करण्याचे फायदे
रोगप्रतिकार शक्ती वाढते
पंचामृतमुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. पंचामृतमध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आणि पौष्टिक घटक असतात. यामुळे शरीर सदृढ बनते.
शरीरातील उष्णता कमी होते
नियमित पंचामृत पिले तर शरीरातील उष्णता कमी होते.
पचनशक्ती वाढते
पंचामृतमध्ये लॅक्टोज असते. यामुळे पचनशक्ती वाढते. तसेच पोटाचे विकार होत नाहीत.
रक्तातील हिमोग्लोबिन वाढते
पंचामृतचे नियमित सेवन केल्याने रक्तातील हिमोग्लोबिन वाढते.
त्वरित ऊर्जा मिळते
पंचामृत पिल्याने शरीराला त्वरित एनर्जी भेटते.
ताणतणाव कमी होतो
पंचामृत अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. मन शांत राहते आणि ताणतणाव कमी होण्यास मदत होते.
दात आणि हाडे मजबूत होतात
पंचामृतमध्ये फॉस्फरस आणि कॅल्शियम भरपूर असतात. यामुळे आपले दात आणि हाडे मजबूत होतात.
त्वचेच्या आरोग्यासाठी गुणकारी
पंचामृताच्या नियमित सेवनाने त्वचा निरोगी राहते, चमकदार बनते.
केसांच्या आरोग्यासाठी गुणकारी
पंचामृताचे नियमित सेवन केले तर केस दात, निरोगी आणि चमकदार होतात. तसेच केसांची वाढही होते.
बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते
पंचामृताचे नियमित सेवन केले बुद्धी तल्लख होते आणि स्मरणशक्तीही वाढते.