मायक्रोसॉफ्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी सत्या नडेला (Satya nadella) यांचा 26 वर्षीय मुलगा जैन नडेला (Zain Nadella) याचे नुकतेच निधन झाले. त्याला गंभीर असा सेलिब्रल प्लासी (Cerebral Palsy) नावाचा आजार होता. जैनवर बऱ्याचदा चिल्ड्रन हॉस्पिटलमध्ये उपचार झाले. पण हा गंभीर आजार आहे तरी काय?
सेरेब्रल प्लासी डोक्याच्या विकारातील एक आजार आहे. हा आजार शारीरिक हालचाल, जसे की चालणे, हातपाय हलवणे यावर प्रभाव टाकतो. मेंदूतील काही भागाचा विकास न होता त्या भागात सेरेब्रल प्लासी होतो. हा आजार मुलं गर्भात असताना किंवा जन्मावेळी किंवा त्यानंतर काही कालावधीत ही होऊ शकतो.
जन्मावेळी रडला नव्हता जैन
ऑक्टोबर 2017 मध्ये सत्या नडेला यांनी आपल्या ब्लॉगद्वारे आपल्या मुलाच्या जन्मबाबत सांगितले होते. त्यात ते म्हणाले होते की, आपल्या गर्भावस्थेत माझ्या पत्नीने अनुभव घेतला की 36 व्या आठवड्यात मुलाने जितकी हालचाल करायला हवी तेवढी आमच्या मुलाने केली नव्हती. त्यानंतर आम्ही एका रुग्णालयात गेलो. तेथे 13 ऑगस्ट 1996 ला रात्री 11.29 मिनिटांनी जैनचा जन्म झाला, पण जन्म झाल्यानंतर तो रडला नव्हता.
नडेला म्हणाले की, जैनला को लेक वॉशिंगटनमधील बेलेव्यु रुग्णालयातून सिएटल चिल्ड्रेन हॉस्पिटलमध्ये आणण्यात आले. त्याच्यावर उपचार सुरू केले गेले. दुसऱ्या दिवशी सकाळी त्याला पाहायला गेल्यावर कळले की तो या आजाराने ग्रस्त आहे.
सेरेब्रल प्लासी आजारामुळे जैन याला कायमच व्हीलचेअरची आवश्यकता भासली. कारण त्याची शारीरिक हालचाल बंद झाली होती.