दूध हे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक आहे. कच्च्या दुधाचा वापर करून त्वचेच्या अनेक समस्यांपासून मुक्ती मिळते. कच्चे दूध त्वचेसाठी मॉईश्चरायझर म्हणून काम करते.जाणून घ्या कच्च्या दुधाच्या वापराने त्वचेच्या कोणत्या समस्या दूर होतात आणि निरोगी त्वचा मिळते.
कच्च्या दुधाचे त्वचेसाठी फायदे
- कच्चे दूध नियमितपणे त्वचेवर लावल्याने मृत त्वचा निघून जाण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा मऊ बनते.
- कच्चे दूध त्वचेवर लावल्याने सुरकुत्या कमी होतात.
चेहरा चमकदार बनतो. - दूधामधील लॅक्टीक अॅसिड चेहऱ्यावरील पिगमेंटेशन हळूहळू कमी करते. त्यामुळे त्वचा उजळते.
मुरुमांची समस्या कमी होते. - कच्च्या दुधामुळे त्वचेचा रंग एकसमान होतो.
- सनटॅनिंग होत असेल तर नियमितपणे कच्चे दूध त्वचेवर लावावे.
कच्चे दूध त्वचेसाठी कसे वापरावे
ताजे कच्चे दूध चेहरा, मान, हात, पायाच्या त्वचेवर लावा. १५-२० मिनिटांनी पाण्याने धुवून टाका.
कच्चे दूध त्वचेवर लावताना कोणती काळजी घ्यावी
त्वचेवर लावण्यासाठी कच्चे दूध शक्यतो ताजे असावे. पिशवीतल्या दुधावर प्रक्रिया केलेली असते त्यामुळे कदाचित काहींच्या त्वचेला ते सूट होत नाही, त्वचा काळी पडण्याची शक्यता असते.
तुमच्या सौंदर्यातच नाही तर, आरोग्यातही भर घालतो गुलाब; जाणून घ्या महत्वपूर्ण उपयोग