टोमॅटो हा पदार्थ सर्वांच्या घरात सहज उपलब्ध असतो. तसेच टोमॅटो खायला सर्वांना आवडते. तुम्हाला माहिती आहे का टोमॅटो आपल्या शरीरासाठी खूप फायदेशीर आहे. त्याची भाजीही आरोग्यासाठी चांगली आहे.
परंतु तुम्ही जर रिकाम्या पोटी टोमॅटो खाल्ले तर त्याचे खूप फायदे आहेत.
– रोज सकाळी उठल्यानंतर रिकाम्या पोटी टोमॅटोचे सेवन करावे. टोमॅटोला काळी मिरी पावडरसोबत खावे. ते केल्याने पोटातील जंत मरतात.
– ज्या लोकांना पोटाच्या उष्णतेचा त्रास आहे अशा लोकांना तर रोज टोमॅटो खावेत. त्यामुळे पोटाची जळजळ थांबेल.
– टोमॅटो वा त्याचा रस जर प्यायला तर हृदयविकाराचा झटका आणि पक्षाघाताचा धोका कमी होतो.
– टोमॅटोचा सर्वात मोठा फायदा म्हणजे डोळ्यांची नजर वाढते. टोमॅटोत व्हिटॅमिन-ए मुबलक प्रमाणात आढळते. त्यामुळे रोज रिकाम्या पोटी टोमॅटो खावे.