पचनसंस्था सुधारते
ओट्समुळे पोट साफ राहण्यास मदत होते ज्यामुळे पचनसंस्थेचे कार्य सुधारते. तसेच ओट्समुळे पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे भूक कमी लागते. शिवाय ओट्स खाण्यामुळे अपचन, बद्धकोष्ठता आणि पोटाच्या समस्यादेखील कमी प्रमाणात होतात.

वजन कमी करण्यास मदत
ओट्समध्ये कॅलरिज कमी प्रमाणात असतात. शिवाय ते पचनासही हलके असते. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी हे फायदेशीर ठरू शकतं. शिवाय ओट्समध्ये भरपूर प्रथिने फायबर्सदेखील मोठ्या प्रमाणावर असतात. ओट्स खाण्यामुळे पोट बराच काळ भरलेलं राहतं. त्यामुळे भूक लागत नाही. ज्यामुळे अती प्रमाणात आहार घेतला जात नाही. त्यामुळे वजन नियंत्रित राहते.

हाडे मजबूत आणि लवचिक बनतात
संपूर्ण शरीरासाठी ओट्स फायदेशीर आहे. ओट्स खाण्याचा महत्त्वाचा फायदा म्हणजे यामुळे हाडांचे आरोग्य सुधारते. कारण ओट्समध्ये सिलिकॉन हा एक महत्त्वाचा घटक असतो. ज्यामुळे शरीरातील हाडे मजबूत आणि लवचिक होतात.

त्वचा मऊ आणि चमकदार बनते
ओटस त्वचेसाठी अतिशय फायदेशीर ठरते. ओट्सचा वापर केल्याने त्वचा मऊ आणि तजेलदार होते. यासाठी ओट्स कच्चा दूधात भिजवून त्याची पेस्ट नियमित त्वचेला लावा. ज्यामुळे त्वचेवर एक प्रकारचा नैसर्गिक चमक येईल.

रोगप्रतिकारशक्ती वाढते
ओट्समध्ये विरघळणारे फायबर्स आणि बीटा ग्लुटेन असतं. त्यामुळे शरीरातील पांढऱ्या रक्तपेशी वाढतात. त्या शरीरातील रोग प्रतिकारक संस्थेचा एक प्रमुख भाग असतात. ओट्समधील झिंक आणि सेलेनियममुळे वातावरणातील इनफेक्शनपासून रक्षण होते. आजारपण दूर ठेवण्यासाठी ओट्सचा आहारात समावेश करावा. कारण त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती बळकट होते.

रक्तातील साखर नियंत्रणात राहते
ओट्स खाल्ल्याने रक्तातील साखर नियंत्रित राहण्यास मदत होते. कारण ओट्समध्ये भरपूर प्रमाणात फायबर्स आणि बीटा ग्लुटेन असते. शरीराचा ग्लायकेमिक इंडेक्स नियंत्रित ठेवण्यासाठी हे घटक गरजेचे असतात. शरीरातील रक्तातील साखर नियंत्रित ठेवण्यासाठी आहारात ओट्सचा वापर करणं गरजेचं आहे.

ह्रदयाचे आरोग्य सुधारते
ओट्समध्ये अँटी ऑक्सिडंट भरपूर प्रमाणात असतात. तसेच यात फायबर्सही पुरेसे असतात. याचा परिणाम ह्रदयाच्या आरोग्यावर होतो. बीटा ग्लुटेन आणि सोल्युबल फायबर्समुळे शरीरातील बॅड कोलेस्ट्रॉलची पातळी कमी होते. ह्रदयावरचा ताण कमी झाल्यामुळे ह्रदयविकार होण्याचा धोका कमी होतो.