ड्रॅगन फ्रूट हे एक परदेशी फळ आहे. मात्र ते आता भारतातही सहजपणे उपलब्ध होत आहे. ड्रॅगन फ्रूट शरीरासाठी उपयुक्त तर आहेच शिवाय त्याचा वापर औषधांमध्येही केला जातो. जाणून घ्या ड्रॅगन फ्रूट खाण्याचे फायदे
पोषक घटक
ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरी, प्रथिने, कर्बोदके, फायबर, फॅट, कार्ब्स, व्हिटॅमिन सी, आर्यन, मॅग्नेशिअम यांसारखे पोषक घटक असतात.
वजन कमी करण्यासाठी उपयुक्त
ड्रॅगन फ्रूटमध्ये कॅलरी कमी असते. तसेच ड्रॅगन फ्रुट खाल्ल्याने पोट बराच वेळ भरलेले राहते. त्यामुळे ड्रॅगन फ्रूट वजन कमी करण्यासाठी उपयोगी पडते.
पोटाच्या समस्या कमी होतात
ड्रॅगन फ्रुटमध्ये फायबर जास्त प्रमाणात असते. त्यामुळे पोटाच्या समस्यांवर ड्रॅगन फ्रूट गुणकारी आहे. ड्रॅगन फ्रूट बद्धकोष्ठता आणि पचनासंबंधी इतर समस्या दूर ठेवण्यास मदत करते.
निरोगी त्वचेसाठी फायदेशीर
ड्रॅगन फ्रूटमध्ये व्हिटॅमिन सीचा स्त्रोत आहे. ड्रॅगन फ्रूटच्या सेवनामुळे तसेच ड्रॅगन फ्रूटचा गर चेहऱ्याला लावल्याने त्वचेवरील पिंपल्सच्या समस्या कमी होतात.
ड्रॅगन फ्रुटचा गर चेहऱ्याला लावल्याने ओपन पोअर्सची समस्या कमी होते. चेहऱ्याची त्वचा घट्ट होण्यास मदत होते. त्यामुळे त्वचा सुंदर आणि तरुण दिसते.
हृदयाच्या आरोग्यासाठी उपयोगी
ड्रॅगन फ्रुटमध्ये ओमेगा -3 आणि ओमेगा -6 फॅटी अॅसिड असते. यामुळे हृदय तंदुरुस्त राहते.
डायबेटिजच्या रुग्णांसाठी गुणकारी
ड्रॅगन फ्रुटमुळे रक्तातील साखर नियंत्रित राहिल्यामुळे डायबेटिजचा त्रास कमी होतो.
रोग प्रतिकारक शक्ती वाढते
ड्रॅगन फ्रुटमुळे प्रतिकारशक्ती वाढते.
संधिवातावर उपयोगी
ड्रॅगन फळामध्ये दाहकविरोधी गुणधर्म असतात. यामुळे शरीरावरील सूज, स्नायूंच्या वेदना कमी होतात.
स्मरणशक्ती वाढवायचीये मग नियमित खा अक्रोड; जाणून घ्या इतर फायदे