हसल्यावर दात दिसतात असं म्हटलं जातं. तसेच आपले दात खराब दिसले तर अनेकजण चिडवतात. शिवाय आपल्यालाही वाईट वाटतं. तुम्हीही या समस्यांना सामोरं जात असाल तर काळजी करू नका. कारण पिवळे पडलेले दात घरगुती उपायांनी स्वच्छ करता येतात. चला तर मग जाणून घेऊ काय आहेत घरगुती उपाय.

– स्ट्रॉबेरी
स्ट्रॉबेरी फळ तुम्हाला माहिती असेल. स्ट्रॉबेरी घ्या, मॅश करा. नंतर त्याने 5 मिनिटे दातांना मसाज करा. असे केल्याने पिवळे पडलेले दात पांढरे होतात.

– सफरचंद व्हिनेगर
दातांचा पिवळसरपणा दूर करायचा असेल तर सफरचंद व्हिनेगर हा सर्वात प्रभावी उपाय आहे. एक कप पाणी घ्या. त्यात सफरचंदाचे व्हिनेगर टाका आणि ब्रशच्या साहाय्याने हळू हळू दात घासा. नंतर फरक पाहा.

– संत्री
संत्र्यात व्हिटॅमिन सी असते. तुम्हाला माहिती आहे का दातांची चमक टिकवून ठेवण्यासाठी संत्र्याचा उपयोग होतो. संत्र्याची साल घेऊन दात नीट चोळा. यामुळे दातांचा पिवळसरपणा दूर होतो. तसेच दातांना चमक येते.

– खोबरेल तेल
एक चमचा तेल घेऊन तोंडात टाकून गार्गल करा. असे सुमारे पाच मिनिटे करा. तुम्ही हे जर दररोज केले तर दातांवरील पिवळेपणा निघून जाईल. शिवाय दात चमकतील.