माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : भारतात चहा प्रेमींचे प्रमाण कमी नाही. आता टी बॅक वापरणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. सहसा टी बॅकचा वापर झाला की ते फेकले जातात. परंतु हे टी बॅक तुम्हाला चांगलेच कामाला येऊ शकते. या टी बॅगमुळे तुम्ही तुमच्या घरातील भांडी चमकवू शकतात. कारण टी बॅगमधील टी पावडरमुळे भांड्यांवरील तेलकटपणा जात असून भांडी चकाचक होतात. (dish wash by tea bag)
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
सध्या सर्वांच्या मागे कामाची धावपळ असते. त्यामुळे अनेकदा रात्री जेवल्यानंतर भांडी घासायची राहून जातात. त्यामुळे ती सकाळी घासावी लागतात. यामुळे भांडी अधिक तेलकट होतात. भांडी वापल्यानंतर ती लगेलच घासली तर ती पटकन स्वच्छ होतात. मात्र, दुसऱ्या दिवसापर्यंत भांडी सिंकमध्ये पडून तेलकट होतात. अशा वेळी भांड्याचा तेलकटपणा काढण्यासाठी टी बॅगमधील पावडर अत्यंत फायदेशीर ठरते. कारण टी बॅग भांड्यामधील तेलकटपणा शोषून घेतात.
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
टी बॅगने अशी करा भांडी स्वच्छ
भांडी खूप तेलकट असतील तर सिंक गरम पाण्याने भरा आणि त्यात ही भांडी भिजत ठेवा. पाण्याने भरलेल्या सिंकमध्ये तीन टी बॅग अडकवा आणि रात्रभर तसचं राहू द्या. यामुळे दुसऱ्या दिवशी तुम्हीला भांडी साफ करणे खूप सोपे होईल. टी बॅगमुळे भांड्यांवरील तेलकटपणा कमी होतो. त्यामुळे तुम्हालाही भांड्याचा तेलकटपणा काढायला फार वेळ लागणार नाही. आणि भांडीही चकाचक होतील.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)