आजकाल कामाचा ताण, दगदग, चिडचिड या गोष्टी कॉमन झाल्या आहेत. ताणतणाव वाढण्यासाठी, चिडचिड होण्यासाठी अगदी छोट्या गोष्टींचंही निमित्त पुरेस ठरतं. मात्र याचे दुष्परिणाम शरीरावर आणि मनावर होतात. ताणतणाव, चिडचिड दूर करण्यासाठी संयमाने वागणे तर जरुरीचं आहे मात्र आहारातही काही बदल करणे आवश्यक आहे. जाणून घ्या ताणतणाव, चिडचिड दूर करण्यासाठी कोणत्या पदार्थांचा समावेश करावा –

डार्क चॉकलेट (Dark Chocolate)
डार्क जलद शरीराला ऊर्जा देते. डार्क चॉकलेट मेंदूची कार्यक्षमता टिकवून ठेवण्यास आणि सुधारण्यास देखील उपयुक्त आहे. चॉकलेटमध्ये विशिष्ट प्रमाणात कॅफीन आणि थियोब्रोमाइन असते. यामुळे ऊर्जा वेगाने वाढते. त्यामुळे रक्तदाब कमी असेल, उदास वाटत असेल, सुस्ती आली असेल तेव्हा डार्क चॉकलेट अवश्य खावे. डार्क चॉकलेट खाण्याने तणाव कमी होतो. डार्क चॉकलेटमध्ये सेरोटोनिन, न्यूरोट्रांसमीटर आणि ट्रिप्टोफॅन ही मानसिक आनंद देणारी रसायने असतात. त्यामुळे मूड सुधारतो.
टीप – डार्क चॉकलेटचे अतिसेवन आरोग्यास घातक आहेत. त्यामुळे डार्क चोकलेटचे सेवन योग्य प्रमाणातच करावे.

अक्रोड (Walnut)
नियमितपणे अक्रोड खाल्ल्यास नैराश्य ताणतणाव कमी होण्यास मदत होते. भाजलेले अक्रोड नियमितपणे खाल्याने शरीरातील ताकद वाढण्यास मदत होते.
अक्रोड खाल्याने कोलेस्ट्रोल कमी होते. त्यामुळे अक्रोडचे सेवन केल्याने रक्तदाब, हृदयरोग आणि इतर काही आजारांचा धोका कमी करण्यास मदत होते.नियमितपणे अक्रोड खाल्ल्यास मेंदूची कार्यक्षमता वाढीस लागते. तसेच स्मरणशक्ती आणि एकाग्रता देखील वाढते.

अंजीर (Fig)
अंजीर खाल्ल्याने, शरीराचा उत्साह वाढून मानसिक थकवाही दूर होतो. अंजीर फळामध्ये कॅलरीज, प्रोटीन, फॅट, कार्बोदके, व्हिटॅमिन ए, बी, सी आणि फायबर असतात. अंजीरमध्ये असणारे व्हिटॅमिन्स आणि अँटीऑक्सिडंट हे घटक प्रतिकारशक्ती वाढवण्यास मदत करतात.अंजीर हे थंड असते. त्यामुळे शरीरातील उष्णता कमी करण्यासाठी आणि रक्तशुद्धीसाठी पिकलेले अंजीर खावे.अंजीर रक्त शुद्ध करते. तसेच पचनासंबंधीच्या समस्या, रक्तदाब, अशक्तपणा यांसारख्या आजारांवर अंजीर गुणकारी आहे.

दही (Yogurt)
दही अँटिऑक्सिडेंट म्हणून काम करते. नियमितपणे दही खाल्ल्यास नैराश्य ताणतणाव कमी होण्यास मदत होते. तसेच त्वचाही अधिक तरुण दिसते. दह्यामुळे रोगप्रतिकार शक्ती वाढते. दह्यामध्ये अधिक प्रमाणात प्रोटीन आणि पौष्टिक घटक असतात. यामुळे शरीर सदृढ बनते.

मनुके (Raisins)
मनुके खाल्ल्याने शरीराला ऊर्जा मिळते. थकवा, ताणतणाव कमी होतो. त्यामुळे रोज सकाळी मनुके खावेत. मनुक्यांमध्ये असलेले अँटीऑक्सिडंट नजर सुधारण्यास आणि डोळ्यांचे आरोग्य उत्तम राखण्यास मदत करते.

केळी (Bananas)
केळीत असणाऱ्या व्हिटॅमिन बी-6 आणि ट्रायफोटोपणमूळे मेंदू शांत राहतो. यामुळे डिप्रेशन किंवा तणावात असणाऱ्या लोकांना केळी खाण्याचा सल्ला दिला जातो. तसेच रक्तातील हिमोग्लोबिन वाढवण्याकरता केळी खाणे उपयोगी आहे. केळीमध्ये थायमिन, फॉलिक ऍसिड आणि लोह मोठ्या प्रमाणात असते.