बदललेली जीवनशैली आणि आहार यामुळे आजकाल रक्तदाबाची समस्या वाढलेली आहे. आहारात काही बदल केले तर रक्तदाबाच्या समस्येवर नक्कीच फरक पडतो. जाणून घ्या रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यासाठी आहारात कोणत्या पदार्थांचा समावेश करावा

दूध आणि दुधाचे पदार्थ :
आहारात दूध आणि दुधाच्या पदार्थांचा समावेश केल्यास रक्तदाब नियंत्रणात राहतो. यातील कॅल्शियम रक्त वाहिना स्वच्छ ठेवण्यास मदत करतात. तसेच यातील खनिजे हृदयाला तंदुरुस्त ठेवतात. दूध, पनीर, ताक सारखे कॅल्शियम युक्त पदार्थ आपल्या आहारात असल्याने तुम्ही अधिक तंदुरुस्त होतात.

केळी :
केळ पोटॅशियमचे एक समृद्ध स्त्रोत आहे. त्यातील खनिजे रक्तदाबाच्या समस्या नियंत्रणात ठेवण्यास मदत करतात. त्यामुळे दिवसभरात एक तरी केळ खाणे तुम्हाला फायदेशीर ठरेल. याशिवाय केळाचा शेक, स्मुदी असे तयार करून तुम्ही केळी खाऊ शकतात.

तांदूळ, शेंगदाणे आणि बदाम :
तांदूळ, शेंगदाणे, काजू, बदाम आणि ओट्स मॅग्निशियमचे स्त्रोत आहेत. हे एक आश्चर्यकारक खनिज आहे जे स्वाभाविकपणे रक्तदाब नियंत्रणात ठेवण्यास मदत करते. कारण मॅग्निशयम रक्तप्रवाह खेळता ठेवण्यास मदत करतात.