कोरोनामुळे मास्क घालणे अनिवार्य झाले आहे. त्यामुळे मास्क वापरणे आणि त्याची स्वच्छता राखणे गरजेचे झाले आहे. जाणून घ्या मास्क वापरताना कोणती काळजी घ्यावी –
1) मास्क लावण्यापूर्वी तुमचे हात स्वच्छ धुवा.
2) तोंड आणि नाक संपूर्ण झाकले जाईल असा मास्क वापरा.
3) मास्क लावल्यानंतर त्याला वारंवार स्पर्श करू नका.
4) मास्क काढताना नाक व तोंडाला स्पर्श करणे टाळा. मास्क मागच्या बाजूने काढा.
5) मास्क काढल्यानंतर हात स्वच्छ धुवा किंवा हाताला सॅनिटायझर लावा.
6) एकदा वापरलेला मास्क पुन्हा वापरताना धुवून घ्या.