कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने हाहाकार माजवला आहे. या काळात आपल्या कुटुंबाची काळजी घेणे फार गरजेचे आहे. कुटुंबाची काळजी घेण्यासाठी काय करावे यासाठी काही टिप्स देत आहोत. कोरोना कालावधीत आपल्या कुटुंबास निरोगी ठेवण्यासाठी या सोप्या गोष्टींचे अनुसरण करा.
*हायड्रेट राहा-
निरोगी राहण्यासाठी हायड्रेट राहणे आवश्यक आहे. उन्हाळ्यात शरीरात पाण्याची कमतरता असते. त्यामुळे डिहायड्रेशनचा धोका आहे. यातून अनेक प्रकारचे आजार उद्भवतात. यापासून बचाव करण्यासाठी जास्त पाणी प्यायला हवे. डॉक्टर दररोज 3-4 लिटर पाणी पिण्याचा सल्ला देतात. त्यामुळे जास्तीत जास्त पाणी पित जा.
*काळजी घ्या-
कोरोना काळात सर्वात महत्त्वाचं म्हणजे काळजी घ्या. कोरोनापासून बचाव करण्यासाठी नेहमी मास्क वापरा. ज्यावेळी घराबाहेर पडाल तेव्हा मास्क परिधान करा. आवश्यक असल्यास घरी देखील मास्क लावा. तसेच सामाजिक अंतर (सोशल डिस्टन्स) राखा. नियमित अंतराने आपले हात धुवा. तसेच कोरोना लस घ्या.
हळदीचे दूध पिण्याचे फायदे माहिती आहेत का?
*संतुलित आहार घ्या-
कोरोना काळाता रोगप्रतिकारक शक्ती मजबूत ठेवणे गरजेचे आहे. त्यासाठी संतुलित आहार घ्यावा. म्हणून तुमच्या आहारात व्हिटॅमिन-सी, फायबर आणि प्रथिनेयुक्त फळे आणि भाज्या समाविष्ट करा.
*दररोज व्यायाम करा-
व्यायाम हा आपल्या दैनंदिन उपक्रमाचा एक भाग असावा. दररोज व्यायाम करणे शरीरासाठी फायदेशीर आहे. तसेच आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांना व्यायामाचा सल्ला द्या. शरीरात रक्ताभिसरण सुरळीत ठेवण्यासाठी दररोज व्यायाम करा. कुटुंबातील सदस्यांसह एकत्र व्यायाम करा. यामुळे एकमेकांचे मनोबल वाढेल.
(टीप- या टिप्स आणि सूचना सामान्य माहितीसाठी आहेत. आजारपण किंवा संसर्गाची लक्षणे आढळल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्या.)
कोरोनाची लक्षणं आढळली तर कोणती टेस्ट कराल?