माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : उन्हाळा आला की केस आणि त्वचेची आधिक काळजी घ्यावी लागते. उन्हाळ्यात सतत येणारा घाम यामुळे केस आणि त्वचेच्या समस्या उद्भवत असतात. त्यामुळे उन्हाळ्यात केसांची काळजी घेण्याचा सल्ला तज्ज्ञांकडून दिला जातो. काय आहेत केसांची काळजी घेण्यासाठी सोपे उपाय? आपण जाणून घेऊयात… (summer hair care tips)
सोपे, गुणकारी उपाय
केस धुणे : उन्हाळ्यात आठवड्यातून किमान दोनदा केस धुवा. केस धुतल्यावर केस पुसून कोरडे करा आणि व्यवस्थित विंचरा.
हे ही वाचा ः शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर
केस झाका : कडक उन्हात घराबाहेर पडताना टोपी घाला किंवा स्कार्फ गुंडाळा. त्यामुळे केसांना ऊन लागणार नाही याची खबरदारी घ्या.
बारिक केस ठेवा : आपले केसांना अधूनमधून कापा. शक्य झाल्यास बारीक ठेवा. यामुळे केसांचा गुंता होणे, केस गळणे अशा समस्या होणार नाहीत.
केसांची मालीश करा – रात्री झोपताना केसांना खोबरेल तेल लावून मालीश करा आणि सकाळी केस धुवा. सकाळी ओंघळ करण्यापूर्वीही किमान तासभर आधी केसांना तेल लावून मालीश करता येईल. त्यानंतर केस धुवा व व्यवस्थित कोरडे करा.
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
लक्षात ठेवा
केस गळणे, कोंडा होणे अशा स्वरुपाची समस्या अनेकांना होतात. अशा वेळी केस आणि त्वचाविकार तज्ज्ञांचा सल्ला घ्या. ज्या शॅम्पू, तेलाची अॅलर्जी आहे ते वापरणे टाळा. केस धुवून झाल्यावर पूर्ण कोरडे करा.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)