थंडीत ओठ खराब होण्याची समस्या अनेकांना जाणवते. त्यासाठी महागडी सौंदर्य उत्पादनं मॉइश्चरायझर आणि लोशन वापरले जातात. परंतु तरीही अनेकांना फरक जाणवत नाही. थंडीत ओठांची काळजी घेण्यासाठी खालील घरगुती उपाय करून पाहा.
खोबरेल तेलानं मसाज करा
खोबरेल तेल त्वचेसाठी तसेच ओठांसाठीही खूप फायदेशीर आहे. खोबरेल तेलात थोडं मीठ मिसळा. नंतर ओठांना मसाज करा. नंतर ओठ पाण्याने धुवा. ओठांवर लिप बाम लावा.
गुलाब पाणी वापरा
एका छोट्या भांड्यात गुलाब पाणी घ्या. त्यात थोडंस ग्लिसरीन मिसळा. नंतर ते कॉटन बॉलच्या मदतीनं ओठांवर लावा. गुलाबपाणी ओठांची मृत त्वचा काढून ओठांना मुलायम करतं. तर ग्लिसरीन ओलावा टिकवून ठेवून ओठांना कोरडं होण्यापासून वाचवते.
लिप बाम
ओठांना मॉइश्चरायझरची गरज असते. त्यासाठी दिवसातून 2-3 वेळा ओठांवर लिप बाम लावा. यामुळं ओठ मऊ राहतील.
एलोवेरा जेलचा वापर
कोरफड ओठांची मृत त्वचा काढण्यासाठी उत्तम पर्याय आहे. कोरफडीचा ताजा गर दिवसातून 2-3 वेळा ओठांवर लावा. नंतर कोरडा झाल्यावर धुवा. यामुळं तुमचे ओठ मऊ आणि सुंदर राहतील.