तुळशीप्रमाणेच तुळशीच्या बिया (सब्जा) देखील गुणकारी आहेत. मात्र अनेकांना या बियांचा वापर कसा आणि कशासाठी करावा याविषयी अनेकांना माहिती नसते. जाणून घ्या तुळशीच्या बियांचे आरोग्यवर्धक आणि सौंदर्यवर्धक फायदे –

शरीरातील उष्णता कमी होते
तुळशीच्या बिया थंड गुणधर्माच्या असल्याने तुळशीच्या बियांचा वापर उन्हाळ्यात करणे अत्यंत लाभदायक असते.
हाताच्या तळव्यांची, तळपायांची आग होणे, शरीराचा दाह, तोंड येणे, लघवीला जळजळ होणे यांसारखे उष्णतेचे आजार तुळशीच्या बियांच्या सेवनाने कमी होतात. यासाठी तुळशीच्या चमचाभर बिया रात्री अर्धा ग्लास पाण्यात भिजवून त्या सकाळी अनाशा पोटी घ्याव्यात.

पचनसंस्था व्यवस्थित राहते
तुळशीच्या बियांमध्ये फायबर म्हणजे तंतुमय पदार्थ मोठ्या प्रमाणावर आढळते. त्यामुळे आपली पचनसंस्था सुरळीत राहते. तसेच वजन कमी होण्यासही मदत होते.

डोळ्यांचे आरोग्य सुधारते
तुळशीच्या बियांमध्ये व्हिटॅमिन ए असल्याने डोळ्यांचे आरोग्य चांगले राहते.

शरीरावरील सूज कमी होते
तुळशीच्या बियांमध्ये अँटी इंफ्लेमेन्टरी गुणधर्म आढळतात. त्यामुळे शरीराच्या एखाद्या अवयवाला सूज आली असेल तर ती कमी होते.

हृदयाचे आरोग्य चांगले राहते
तुळशीच्या बियांमध्ये पोटॅशियम मोठ्या प्रमाणात आढळते. त्यामुळे धमन्या आणि रक्तवाहीन्यांमधील ताण कमी होतो. त्यामुळे हृदयाचे आरोग्य चांगले राहते.

केसांच्या आरोग्यासाठी उपयुक्त
तुळशीच्या बियांमध्ये मोठ्या प्रमाणात लोह असते, त्यामुळे केसांचे आरोग्य व्यवस्थित राहण्यास मदत होते. तुळशीच्या बियांच्या सेवनाने केस गळती, केसांची वाढ होणे यांसारख्या समस्या कमी होतात.