पावसाळ्यात सारखा ताप येत असेल आणि साधारण उपायांनी कमी होत असलं तर खालील आजरांची लक्षणे असू शकतात. जाणून घ्या पावसाळ्यात येणार ताप कोणत्या आजरांची लक्षणे असू शकतो –

मलेरिया-
या आजारात शरीर थरथर कापू लागतं, अचानक थंडी वाजू लागते, अंगदुखी आणि घाम येणे यांसारखी लक्षणं दिसतात.

डेंग्यू –
या आजारात रूग्णांना अचानक ताप येतो. त्वचेवर पुरळ येतात. मोठ्या प्रमाणात डोकेदुखी, स्नायूदुखीची लक्षणं दिसतात.

टायफॉईड –
हा आजार दूषित अन्न आणि पाण्याच्या सेवनाने होतो. यामुळे हिवताप, पोटात दुखणे, डोके दुखते.

गॅस्ट्रोएन्टेरिटिस-
या आजारामुळे पोटात जळजळ होते आणि पोटात कळा येऊ लागतात.