पीरियड्स हा महिलांच्या आयुष्याचा भाग आहे. महिलांना वयाच्या 12-13 वर्षांच्या आसपास मासिक पाळी (Menstrual cycle) सुरू होते आणि 40 ते 45 वर्षांपर्यंत टिकते. हे वय प्रत्येक स्त्रीसाठी वेगळे असू शकते. पण 45 वर्षानंतर जर तुम्हाला एका वर्षांपर्यंत मासिक पाळी येत नसेल तर हे रजोनिवृत्तीचे (मेनोपॉज) Menopause) लक्षण असू शकते, परंतु हे लक्षात ठेवा की रजोनिवृत्तीची ही लक्षणे तुम्ही गर्भवती नसाल किंवा आजारी असाल तरच दिसून येतात. रजोनिवृत्तीच्या काळात महिलांच्या शरीरात अनेक प्रकारचे शारीरिक आणि मानसिक बदल होतात.बऱ्याच स्त्रियांमध्ये हे अगदी सौम्य असू शकतात, परंतु काही स्त्रियांमध्ये ते गंभीर देखील असू शकतात. निरोगी आहार, चांगली जीवनशैली, व्यायाम आणि भावनिक आधार याद्वारे महिला रजोनिवृत्तीची लक्षणे कमी करू शकतात. रजोनिवृत्तीपूर्वी महिलांना त्यांच्या शरीरात काही लक्षणे दिसतात.(Symptoms Of Menopause)

अनियमित मासिक पाळी (Irregular menstrual periods)

रजोनिवृत्तीपूर्वीही (मेनोपॉज) महिलांना अनेकदा अनियमित मासिक पाळीच्या समस्येला सामोरे जावे लागते. यामध्ये, रक्तस्राव खूप हलका असतो आणि खूप कमी काळ टिकतो. कधीकधी दोन महिन्यांच्या अंतरानंतरही मासिक पाळी येते, हे रजोनिवृत्तीचे लक्षण मानले जाऊ शकते. परंतु हे लक्षात ठेवा की पूर्ण रजोनिवृत्तीनंतर थोडासा रक्तस्त्राव झाला तरीही डॉक्टरांचा सल्ला घ्या.

योनीमध्ये कोरडेपणा (Dryness in the vagina)

रजोनिवृत्तीपूर्वी, स्त्रियांना त्यांच्या योनीमध्ये लक्षणीय कोरडेपणा जाणवू शकतो. यामुळे काही वेळा महिलांना सेक्स करताना समस्या येऊ शकतात. योनीमार्गात कोरडेपणासोबतच आजूबाजूची त्वचाही खूप कोरडी होते, अशा स्थितीत योनीमार्गाच्या आजूबाजूच्या त्वचेला कोरडेपणापासून वाचवण्यासाठी चांगल्या दर्जाचे मॉइश्चरायझर वापरा.

मन हेलकावे खाणे (मूड स्विंग्स) (Mood swings)

रजोनिवृत्ती दरम्यान हार्मोनल बदलांमुळे महिलांना मूड स्विंगचा त्रास होऊ शकतो. त्याच वेळी, जेव्हा आधीच तणाव आणि चिंतेची समस्या असते तेव्हा ही परिस्थिती अधिक गंभीर होऊ शकते. अशा परिस्थितीत डॉक्टरांना भेटण्यासोबतच तुमच्या आजूबाजूला अशा लोकांना ठेवा जे तुमचा मूड सुधारू शकतील आणि तुमचे ऐकू शकतील.

झोपेच्या समस्या (sleep problems)

रात्री उठणे किंवा झोपेची समस्या अनेक कारणांमुळे होऊ शकते, परंतु जर तुम्हाला सहसा झोपेचा त्रास होत नसेल तर ते रजोनिवृत्तीचे लक्षण असू शकते. जास्त वेळ झोप न लागल्यामुळे चिडचिडेपणासह डोकेदुखीचा त्रास होऊ शकतो. अशा परिस्थितीत डॉक्टरांचा सल्ला जरूर घ्या.

शरिरात उष्णता वाढणे (Increase in body heat)

रजोनिवृत्तीपूर्वी महिलांमध्ये हॉट फ्लॅशची लक्षणे देखील दिसू शकतात. यामध्ये रात्री खूप घाम येणे, अचानक उष्णता जाणवणे, थंडी जाणवणे, हृदयाचे ठोके जलद होणे, त्वचा लाल होणे ही लक्षणे दिसू शकतात. 1 मिनिट किंवा 5 मिनिटे टिकू शकते. ते सौम्य किंवा गंभीर असू शकतात. जर ही समस्या गंभीर झाली तर नक्कीच डॉक्टरांशी संपर्क साधा.

ही लक्षणे रजोनिवृत्तीपूर्वी किंवा नंतर दिसू शकतात. तथापि, ही लक्षणे प्रत्येक स्त्रीसाठी भिन्न असू शकतात. अशा परिस्थितीत लक्षणे दिसू लागल्यावर डॉक्टरांचा सल्ला घ्या.

(Symptoms Of Menopause In Women)