मानसिक आणि शारीरिक आरोग्य चांगले ठेवण्यासाठी सूर्य नमस्कार (Surya Namaskar) फायदेशीर आहेत. रोज सूर्य नमस्कार करत असाल तर फिट राहण्यासोबत तुमचे अनेक आजारही दूर होतील. सूर्य नमस्कार हे रिकाम्या पोटी सकाळी लवकर घातले जातात. सूर्य नमस्कार योगची प्रक्रिया साधारण 12 चरणांमध्ये पूर्ण होते आणि प्रत्येक पायरीवर एक वेगळं आसन यामध्ये करावं लागतं. जाणून घ्या सूर्यनमस्कार घालण्याचे अनेक फायदे –

शरीर सुदृढ आणि लवचिक बनते
नियमित सूर्य नमस्कार केल्याने शरीर सुदृढ आणि लवचिक होते.

तणावापासून मुक्ती
नियमित सूर्य नमस्कार केल्याने ध्यानधारणाही होते आणि त्यामुळे मन एकाग्र करण्यास शक्ती मिळते. त्यामुळे तणावापासून मुक्ती देण्यास याचा फायदा मिळतो. यामुळे शरीरातील विषारी पदार्थ बाहेर काढण्यास मदत मिळते आणि तुमची दृष्टीही सकारात्मक होण्यास मदत मिळते. नियमित सूर्य नमस्कार केल्याने भावनिक स्थिरता वाढते आणि आपली सर्जनशील आणि मानसिक क्षमता वाढते.

जाणून घ्या डोळे का येतात आणि लक्षणे, कारणे, उपाय आणि गैरसमज याविषयी माहिती

शांत झोप
सूर्य नमस्कार मनाला विश्रांती देते आणि झोप शांत आणि चांगली येते.

मांसपेशी मजबूत बनतात
नियमित सूर्य नमस्कार केल्याने मांसपेशीची गतीविधी वाढवून त्याच्या कार्यक्षमतेमध्ये सुधारणा होते. सूर्य नमस्कारातील अनेक योगांमुळे शरीराला अधिक मजबूती मिळते. तसंच शरीराशी संबंधित मांसपेशीमध्येदेखील सुधारणा होतात.

श्वासासंबंधित विकार होत नाहीत
श्वसन तंत्र मजबूत होते आणि आतड्यांच्या कार्यक्षमतेमध्येही सुधारणा होते. तसंच हे सुधारल्यामुळे श्वासासंबंधित विकारही होत नाहीत.

केसांचे आरोग्य
मन शांत राखण्यासाठी सूर्य नमस्काराचा प्रयोग करण्यात येतो. ही प्रक्रिया तुम्हाला शांत करते तसेच रक्ताभिसरण सुधारल्याने केस आणि त्वचा सुंदर बनते.

नियमित मासिक पाळी
मासिक पाळी नियमित आणण्यासाठी सूर्यनमस्काराच्या आसनांचा फायदा होतो.

पचनतंत्र व्यवस्थित राहते
सूर्य नमस्काराने शरीरातील प्रत्येक भागावर प्रभाव पडतो. तसंच योग प्रक्रियेदरम्यान प्रत्येक पायरीवर श्वास घेण्याच्या पद्धतीमुळे तुमच्या आतड्यांचीही क्रियाशीलता वाढते आणि शरीर प्रक्रिया सुधारण्यास मदत मिळते. परिणामी पचनतंत्र व्यवस्थित राहते.

मोबाईलवर हेल्थ अपडेट मिळविण्यासाठी आमचा ग्रुप जॉईन करा…