उन्हाचे चटके अधिक जाणवू लागले आहेत. त्यात मागील काही वर्षांपासून कोरोनामुळे बंद असलेल्या शाळा शाळा पुन्हा सुरू झाल्याने मुलं शाळेत जाऊ लागली आहेत. त्यामुळे मुलं थकून घरी येत आहेत. परंतु मुलांचा थकवा घालवण्यासाठी असे काही थंड पेय आहेत जे एकदम ‘हेल्दी ड्रिंक्स’ असून मुलांना पुन्हा फ्रेश करतील. चला तर मग आपण पाहुयात कोणते आहेत हे ज्युस.

लिंबू पाण्यातून वाढवा इम्युनिटी :
इंडिया परेटिंग मध्ये सादर झालेल्या अहवालात मुलांना उन्हाळ्याच्या दिवसात लिंबू पाणी आवर्जून पियायला द्यावे. लिंबू पाण्यात व्हिटॅमिन सी चे अरमान भरपूर असते, जे थकलेल्या मुलांना रिफ्रेश करतील. तसेच लिंबू पाण्यामुळे इम्युनिटीही वाढते. मात्र लिंबू पाण्यात बर्फाचा कमी वापर केला पाहिजे.अन्यथा सर्दी आणि घशाचा त्रास होऊ शकतो.

हेल्दी स्ट्रॉबेरी मिल्कशेक :
स्ट्रॉबेरी मुलांचे आवडीचे फळ असते. त्यामुळे मुलांना हेल्दी स्ट्रॉबेरी मिल्कशेक पाजावा. त्यात तुम्ही ड्राय फ्रुटचा ही वापर करू शकतात. यात तुम्ही फ्रेश क्रीम देखील वापरू शकतात. त्यामुळे मिल्कशेकचा स्वाद वाढतो आणि मुलांना हे पेय पिऊन ताकद येते.

मँगो शेक :
उन्हाळ्यात मुले आंब्याची वाट पाहत असतात. त्यामुळे याच आंब्याचे हेल्दी समर ड्रिंक म्हणून मँगो शेक बनवून देऊ शकतात. यात तुम्ही साखरे ऐवजी माधाचाही पवार करू शकतात. या शेक मधील पोषक तत्व तुमच्या मुलांना आरोग्यदायी ठरतील.

गुलकंद मिल्कशेक :
गुलकंद मिल्कशेक पिल्याने शरीरातील उष्णता कमी होते. तसेच हिट स्ट्रोकची समस्याही जाणवत नाही. हे मिल्कशेक मुलांना पियायला दिल्याने मुलांमध्ये तरतरी वाढेल. गुलकंद सिरप स्वरूपातही मिळतो. यात काही फळांचे कप टाकून तसेच सुका मेवा टाकून मुलांना पियायला दिल्यास मुलांच्या या आरोग्याला त्याचा फायदा होईल.

फळांची स्मूदी :
मुलांना तुम्ही जितकी फळे खायला घालाल तितके फायदेशीर. मुलांना तुम्ही फळांची स्मूदी, मोसंबी ज्युस, गुलाब दूध, पिच स्मूदी पियायला देऊन उन्हाळ्यात होणाऱ्या आजारापासून सुरक्षित करू शकतात.