उन्हाळ्यात उष्णता कमी करण्यासाठी, घशाची कोरड कमी करण्यासाठी थंड पदार्थ, सरबत अधिक प्रमाणात घेतले जातात. मात्र थंड पदार्थ खाल्ल्याने बहुतांश जणांना सर्दी, घसादुखीचा त्रास होतो. यावर काही घरगुती उपाय केले तर तात्काळ फरक पडू शकतो. जाणून घ्या उन्हाळ्यात सर्दी, घसादुखी झाल्यास कोणते उपाय करावेत –
1) एक ग्लास दुधामध्ये लसणाच्या दोन-चार पाकळ्या व थोडी हळद टाकून उकळवून घ्या आणि रात्री झोपण्यापूर्वी प्या.
2) चहामध्ये आले घालून प्या. आले घशाचे इन्फेक्शन दूर करते तसेच रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.
3) गरम पाण्याने गुळण्या करा. यामुळे घशातील कफ निघून जाण्यास मदत होते.
4) आल्याच्या रसामध्ये मध मिक्स करा. हे मिश्रण दिवसातून दोनदा एक एक चमचा घ्या.
5) गरम पाण्याची वाफ घ्या. सर्दी खोल्यामुळे श्वसन नलिकेत कफ जमा होतो तसेच घसा खवखवतो. गरम पाण्याच्या वाफेमुळे कफ कमी होण्यास मदत होते.
6) कपभर पाण्यात आल्याचा तुकडा , चिमूटभर दालचिनी आणि 4-5 काळे मिरे टाकून उकळून घ्या . कोमट झाल्यावर त्यात मध टाकून प्या. खोकल्यावर तात्काळ आराम पडतो.