अनेकांना त्वचेच्या समस्या असतात. तरुण तरुणींना वयात येताना चेहऱ्यावर तारुण्यपिटीका (फोड) यायला लागतात. त्यामुळे अशावेळी सिरम, स्क्रब किंवा टोनरचा वापर केला जातो. परंतु याने फारसा फरक पडत नाही. चांगल्या त्वचेसाठी चांगला आहाराचं गुणकारी ठरतो.
एक अहवालानुसार कमी प्रमाणात असलेले ग्लाइसेमिक आणि भरपूर प्रोटीन असलेले पदार्थ तारुण्यपिटीका रोखण्यास फायदेशीर ठरतात. कोणते आहेत ते पदार्थ हे आपण जाणून घेणार आहोत.
लिंबू :
लिंबूमध्ये एंटीकार्सिनोजेनिक घटक असतात, जे त्वचा निर्मळ बनवतात. यामुळे चेहऱ्यावरील तारुण्यपिटीका कमी होऊन त्याचे डागही जातात. मात्र लिंबाच्या रसाचा थेट चेहऱ्यावर उपयोग करता काम नये. कारण यात भरपूर ऍसिड असते. त्यामुळे लिंबाच्या रसापासून तयार करण्यात आलेल्या सिरमचा वापर करावा. किंवा लेमन टी सेवन केल्यानेही तुम्हाला चांगले परिणाम दिसतील.
रताळे :
रताळ्यामध्ये बीटा केरेटिन असते, जे व्हिटॅमिन ए ला प्रभावित करतात. रातळ्याच्या सेवनाने त्वचा तजेलदार होते.
केळ :
केळ क्रूसिफेरस परिवारातील भाग आहे आणि कॅल्शिअम, मॅग्नेशियम, तांबे, व्हिटॅमिन ए, के आणि सी याने समृद्ध असते. केळातील एंटीऑक्सीडेंट आणि फायबर त्वचेला हाइपरपिग्मेंटेशनशी लढण्यास मदत करते. त्यामुळे त्वचेला एक सारखा रंग येतो.
भोपळा :
भोपळ्यात जिंक, अल्फा हाइड्रॉक्सी एसिड आणि अन्य फ्रूट एंझायम सारखे पोषक तत्व असतात. ज्यामुळे त्वचा नरम बनते. यामुळे त्वचेतील तेलकटपणा देखील नियंत्रणात राहतो आणि चेहऱ्याच्या त्वचेवरील छिद्र साफ राहतात.