आजकालच्या धावपळीच्या जीवनशैलीत अपचन, गॅस, अॅसिडिटी, बद्धकोष्ठता ही सामान्य तक्रारी बनल्या आहेत. या त्रासापासून सुटका मिळवण्यासाठी लोकांना औषधे घ्यावी लागतात पण त्याने तात्पुरती आराम मिळतो. परंतु नियमित योगासने केल्याने पचनक्रिया सुधारते आणि पचनसंस्थाही बळकट होते. जाणून घ्या पचनसंस्था मजबूत करण्यासाठी कोणती योगासने करावीत –
वज्रासन (Vajrasana)
जेवण झाल्यावर 5 ते 10 मिनिट वज्रासन मध्ये बसावे. हे केल्याने पचन सुधारते.
वज्रासनात बसल्याने गॅस आणि अॅसिडिटीचा त्रास कमी होतो.
पोटाचे त्रास दूर करण्यासाठी हा सर्वात चांगला योगासन आहे. हे योगासन जेवण झाल्यावर देखील करता येते.
भुजंगासन (Bhujangasana)
भुजंगासन केल्याने पोटाची चरबी कमी होते आणि अन्नाचे लवकर पचन होते. अॅसिडिटीचा त्रास कमी करण्यासाठी भुजंगासन करणे चांगला पर्याय आहे.
त्रिकोणासन (Trikonasana)
बद्धकोष्ठतेचा त्रास असल्यास त्यावर उपचार करते. हे यकृत आणि आतड्यांसंबंधी मार्ग सक्रिय करते. ज्यांना भूक कमी लागते त्यांच्यासाठी हे सर्वोत्तम योगासन आहे.
मलासन (Malasana)
हे योगासन नियमित केल्याने पोटफुगी आणि बद्धकोष्ठतेचा त्रास दूर होतो. या योगासनामुळे चयापचय सुधारते. हे आसन बद्धकोष्ठताचा त्रास दूर करण्यासाठी फायदेशीर आहे.
नौकासन (Naukasana)
या योगासनामुळे पचनशक्ती सुधारते. पोटांच्या स्नायूंना बळकट करण्यासाठी नौकासन हे उत्तम आसन आहे. या आसनामुळे आतड्यांना शक्ती मिळते हे पाचक रसांचे स्त्राव देखील सुधारते.
पवनमुक्तासन (Pavanamuktasana )
हे योगासन पोटातील गॅस, अपचन आणि सूज कमी करते.
या योगासनामुळे आतड्यांना चालना मिळते.