माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : तंदुरुस्त राहण्यासाठी सुकामेवा अत्यंत गुणकारी ठरतो. काजू, बदाम, अक्रोड, मनुका, खजूर या ड्रायफ्रुट्समुळे थायरॉइडसंबंधित समस्या दूर होतात. त्यात अक्रोडही अत्यंत औषधी आहे. काय आहेत अक्रोडमधील गुणधर्म जाणून घेऊयात…(Walnut)
उच्च रक्तदाबावर फायदेशीर
अक्रोड खाल्ल्याने उच्च रक्तदाब नियंत्रणात राहतो. एक अभ्यासानुसार दररोज 28 ग्रॅम अक्रोड खाल्ल्याने रक्तदाब नियंत्रित राहण्यास मदत होते. तसेच हृदयविकाराचा धोका खूप कमी होतो.
हे ही वाचा ः वजन कमी करण्यासाठी ‘हे’ ड्रिंक आहे अत्यंत गुणकारी
अक्रोडमधील गुणधर्म
कोलेस्टेरॉल कमी करणे, मेंदूची शक्ती वाढवणे, कर्करोग, मधुमेह यांसारख्या आजारांचा धोकाही अक्रोडमुळे मोठ्या प्रमाणात कमी होतो. अक्रोड कोणत्या रोगांमध्ये फायदेशीर आहे हे जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
हृदयविकाराचा धोका घटतो
अनेक संशोधनातून असे समोर आले आहे की अक्रोड खराब कोलेस्ट्रॉल कमी करते. यामुळे हृदयविकाराचा धोका घटतो.
हे ही वाचा ः डायबेटीजवर जांभूळ गुणकारी, जाणून घ्या जांभूळ खाण्याचे इतर फायदे
मधुमेहामध्ये फायदेशीर
अक्रोड फक्त हृदयासाठीच नाही तर टाइप २ मधुमेहाच्या रुग्णांसाठीही फायदेशीर आहे. ज्यांना मधुमेह आहे त्यांना मधुमेह होण्याचा धोका कमी असतो.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)