माझं आरोग्य टीम (Maz Arogya Team) : सध्या केसगळती किंवा केस पांढरे होणे ही समस्या सर्वांना भेडसावू लागली आहे. तरीही केसांची काळजी घेण्याची गरज असून केसगळती रोखण्यासाठी काही सोपे उपाय करणे आवश्यक आहे. केस धुतल्यानंतर अनेक महिला केसांना टॉवेल गुंडाळतात. मात्र, असे करणे टाळावे…ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळणे तुमच्या केसांसाठी हानीकारक ठरू शकते. (Stop wrapping your hair in a towel)
ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केस जास्तवेळ ओले राहतात. त्यामुळे केसांचे नुकसान होऊ लागते. त्याऐवजी केस धुतल्यानंतरक महिला हेअर ड्रायरचे हिट हे फंक्शन बंद करून हेअर ड्रायरने केस सुकवू शकतात. यामुळे केस पटकन कोरडे होतील. आणि डोक्याच्या त्वचेची हानी टाळून केसगळती होणार नाही. मात्र, हेअर ड्रायरचा वापर हिट फंक्शन बंद करूनच करावा. याशिवाय आठवड्यातून 2 ते 3 वेळा शॅम्पू करावा. अधिक शॅम्पू केल्याने केस पातळ होऊ शकतात.
हे ही वाचा ः शांत झोपेसाठी रोज पिस्ता खा..! ताणतणाव, चिंता राहिलं कायमची दूर
केसांना टॉवेल गुंडाळण्याचे तोटे
– केसगळतीची समस्या असलेल्या महिलांनी ओल्या केसांवर टॉवेल गुंडाळल्याने केसगळती आणखी वाढू शकते.
– टॉवेल घट्ट बांधल्याने केसांची मुळे नाजूक होऊन केस लवकर तुटू लागतात.
– टॉवेल गुंडाळल्याने डोक्याची त्वचा जास्त वेळ ओले राहते आणि त्यामुळे कोंडा होऊ शकतो.
– केसांची नैसर्गिक चमक निघून जाते.
– टाळूमध्ये बुरशीजन्य संसर्ग होऊ शकतो.
हे ही वाचा ः Diabetes : बदाम खा अन् मधुमेह नियंत्रित ठेवा, संशोधनात सिद्ध
चमकदार केसांसाठी उपाय
केस धुण्यापूर्वी तेलाने मसाज केल्यास केस चमकदार होतात. खोबरेल तेल किंवा इतर कोणतेही तेलाचा यासाठी वापर करता येईल.
तसेच यामुळे केसगळती, कोंडा व इतर समस्या दूर होतील.
(संशोधन, घरगुती उपचार यावर आधारित ही माहिती असून त्याला आम्ही दुजोरा देत नाही.)