झोपताना कोमट पाणी प्या. यामुळे श्वास नलिका मोकळी होऊन जाते, त्यामुळे झोपेत घोरण्याची सवय कमी होईल.

सिगरेट पित असला तर बंद करा. त्यामुळे घोरण्याची समस्या उद्भवू शकते किंवा वाढू शकते.

लसूण आणि मोहरीचे तेल गरम करून गळ्यावर आणि छाती वर मालिश करा.

मध खाल्याने घोरण्याची सवय कमी होते. दररोज दिवसातून दोन ते तीन वेळा एक चमच मधाचे सेवन नक्की करा.